निगडी शाळेचे शिक्षक दिनेश रांगळे सर यांचा सत्कार
प्रतिनिधी,
म्हसळा- दिनांक १८ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळावा निमित्त निगडी शाळेचे उपक्रमशिल शिक्षक श्री श्री दिनेश रांगळे सर यांचा सत्कार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभहस्ते करण्यात आला. . ... . ... निगडी शाळा डिजिटल करण्यासाठी रांगळे सरांची महत्वाची भूमिका होती. शाळेत, केंद्र स्तरावर तालुका, जिल्हा स्तरावर विविध उपक्रमशिल कामगिरी दिसून येते समाजाशी अतूट नाते आहे., सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले यावेळी निगडी ग्रामस्थ अध्यक्ष तथा उपसरपंच श्री. गणू बार, शा.व्य.समिती सदस्य श्री.जयवंत मोरे, संतोष पाटेकर,मिलिंद मोरे,दिपक वनगुले शिक्षक जाधव सर, जळकोटे सर, ग्रामस्थ व पालक, आई वडील उपस्थित होते. पालकमंत्री चव्हाण साहेब, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वेणूनाथ कडू साहेब होते, राजेशजी सुर्वे साहेब, नरेश सावंत सर नितिन गर्जे सर उपस्थित होते
रांगळे सर आणि कुटुंब


Post a Comment