मृत्यूशी झुंज देत असताना अखेर दहावीच्या विद्यार्थिनीची प्राणजोत मावळली...

मृत्यूशी झुंज देत असताना अखेर दहावीच्या विद्यार्थिनीची प्राणजोत मावळली

म्हसळा - निकेश कोकचा 

१ मार्च पासून सुरु झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत म्हसळा तालुक्यातील आंबेत येथील विद्यार्थिनीने १० वी बोर्डाचा पहिला मराठीचा पेपर देऊन झाल्यानंतर अचानक तिझ्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने तीला अचानक मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अव्वाच्यासव्वा रक्कम सांगितल्याने मुलीच्या नातेवाईकांनी तीला कांदेवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.तेथे तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.कु.विनया लक्षम डोंगरे वय १८ वर्षे रा.आंबेत,ही विद्यार्थी या वर्षी सावित्री माध्यमिक हायस्कूल मधून आपली दहावी बोर्डाची परीक्षा देत होती.१ मार्च रोजी बोर्डाचा पहिला मराठीचा पेपर देऊन झाल्यानंतर अचानक तिझ्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याचे तिझ्या घरच्यांना लक्षात आले.या नंतर तीला मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मुलीच्या घरच्यांची परिस्थिती बेताची असल्याने खासगी रुग्णालयातील खर्च त्यांना आपल्या आवाका बाहेरचा वाटला.यानंतर त्यांनी त्या मुलीला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केली.तेथे तिझा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदर विद्यार्थिनीचा प्राण वाचवण्यासाठी आंबेतकोंड,पाचवावाडी येथील काही तरुणांनी उपचारासाठी रक्कम देखील गोळा केली होती.या घटनेने संपूर्ण तालुक्याला हादरून ठेवले असून पैशांच्या अभावामुळे त्या तरुणीला आपले प्राण गमवावे लागले.गरिबांसाठी अद्यापही शासकीय योजना ह्या नाममात्र असून म्हसळा,माणगाव येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर एखाद्या खाजगी दवाखान्या प्रमाणे रुग्णांकडून पैशाची मागणी करताना निदर्शनात येतात.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा