१९९३ बॉम्बस्फोट प्रकरण, फारुक टकलाचे आंबेत कनेक्शन...
फारुक टकला..१९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी . . .या टकलाचे कनेक्शन रायगड जिल्ह्यातील आंबेतपर्यंत येवून पोहचल्याचे उघड झाले आणि रायगडात खळबळ उडाली आहेत . आंबेत येथील एका शिक्षकाच्या नावावर या फारुक टकलाचे पासपोर्ट नुतनीकरण झाल्याचे समोर आले आहे . मात्र या नावाचा शिक्षकच नसल्याचा दावा संबंधीत शाळेने केल्यामुळे या प्रकरणातील गूढ़ वाढले आहे
फारूक टकला याला दुबईत सीबीआयने अटक केली आहे . १७ मार्चला सीबीआयचे पथक या प्रकरणाच्या चौकशीसाठी आंबेत येथे आले होते . १९९३ मध्ये आंबेतमधील एका शाळेवर मोहम्मद मिया शिक्षक म्हणून कार्यरत होते , अशी माहिती सीबीआयला मिळाली होती . मोहम्मद मिया यांच्या राहत्या घराचा पत्ता देऊन फारूक टकला याने पासपोर्टचे नुतनीकरण केले होते . त्यामुळे सीबीआयच्या टीमने आंबेत येथे येऊन या शिक्षकाबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला . मात्र मोहम्मद मिया । नावाचे शिक्षक आंबेतमधील शाळेत कार्यरत नव्हते , अशी माहिती सीबीआयच्या टीमला मिळाली आहे . फारूक टकला हा दाऊद इब्राहिमचा विश्वासू सहकारी होता . त्याचा १९९३ बॉम्बस्फोटात सहभाग होता . बॉम्बस्फोटानंतर फारूक टकला हा परदेशात फरार झाला होता . त्यानंतर दुबई येथे सीबीआयने फारूक टकला याला अटक केली होती . त्यानंतर फारूक टकला याचे रायगडमधील पासपोर्ट कनेक्शन समोर आले आहे . १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी म्हसळा येथील काही जणांना अटक झाली होती . त्यानंतर त्यांना शिक्षाही झाली होती . मोहम्मद मिया या नावाचे शिक्षक आंबेत येथील शाळेत कार्यरत नसताना त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे करून पासपोर्टचे नुतनीकरण करण्यात आले असल्याने यामधील गूढ अजूनच वाढले आहे फारुक टकला याच्या पासपोर्ट नुतनीकरण पत्याच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक आंबेत येथे येऊन गेल्याच्या बातमीला पोलीस अधिकार्यांनीदेखील दुजोरा दिला आहे . मात्र संबंधीत शिक्षक कुठे गायब झाला , याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे . दरम्यान , फारूक टकल्याच्या आंबेत व म्हसळा कनेक्शनबाबत खुलासा झाल्यानंतर अजून नव्याने कोणाचे नाव या प्रकरणात जोडले जाते ? या चर्चेला म्हसळा तालुक्यात उधाण आले आहे आंबेत नजीकची संदेरी जेटी येथेदेखील १९९३ साली संशयित वस्तू उतरल्या होत्या . यामुळे आंबेत पंचक्रोशीत या घटनेमुळे खळबळ उडाली आहे .

Post a Comment