श्रीवर्धनमध्ये वणव्याने वनसंपत्तीचे झाले नुकसान ; वणवे विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे वास्तव
श्रीवर्धन : संतोष चौकर
पावसाळा संपल्यानंतर सर्वत्र हिरवेगार असणारे डोंगर व माळरान या ठिकाणी असलेले गवत सुकु लागते तिकमी गवत सुकल्यावर ते खुप कडक होते , आणि अशा ठिकाणी वणवा लागल्यानंतर गवत एवढ्या वेगाने पेटत जाते कि पाहणार्याला असे वाटेल कि कोणतातरी ज्वालाग्राही पदार्थ टाकुन आग लावली आहे कि काय ? त्यातच जोरदार वारे वाहात असल्यास वणवा अनेक किलोमीटरवर पसरतो . श्रीवर्धन तालुक्यात मागील पाच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याच्या घटना घडल्या आहेत . श्रीवर्धन परिवहन स्थानकाच्या मागील बाजूला असलेला डोंगर वणवा लागल्यामुळे भस्मसात झाला आहे . खेर्ड गावाच्या हद्दीत असलेला कमितकमी पंधरा किलोमीटर परिघाचा डोंगर जळून खाक झाला आहे. बोडणी घाटात एक काजूची बाग वणव्यात भस्मसात झाली असुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रानवली धरणाच्या जवळ असलेला डोंगर व त्या ठिकाणी मालकी जागेत असलेल्या आंबा व काजूच्या बागा जळून खाक झाल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत . गाणी व साखरोणे गावांच्या हद्दीतील डोंगरावर वणवे पेटलेले दिसत होते . वणवा लागल्यानंतर त्या परिसरात असलेल्या वनसंपत्तीचे नुकसान होते परंतु अनेक फळबागा उध्वस्त होऊन जातात . त्याचबरोबर जंगलात असणारे अनेक दुर्मिळ वन्यजीव नष्ट होतात . ससे , विविध जातीचे साप . उंदीर , भेकरे , रानडुकरे , खवलेमांजर , सालजीव , काळमांजर , घोरपड यासारखे अनेक लहान मोठे वन्यजीव मृत होतात . वणवा लागण्याची अनेक कारणे असु शकतात कोणीतरी जळती वीडी किंवा सिगारेट फेकणे . शेतात मशागती साठी पेटविलेल्या राबामधील ठिणगी उडुन आग लागणे , कोणीतरी जाणूनबुजून लावणे व जंगलातून व माळरानातुन जाणाच्या वीजेच्या तारा . ज्या ठिकाणी वीजेच्या तारा गेलेल्या आहेत अशा ठिकाणी झाडे झुडपे जवळ असल्यामुळे वारा सुटल्यानंतर वीजवाहक तारेला झाडाच्या फांद्या लागल्यास पडणाच्या ठिणग्या सुद्धा वणवा लागण्यास कारणीभूत ठरतात वणवालागल्यानंतर वनविभागाकडे तो विझविण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नाही . शासनाने भविष्यात वणवे विझविण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर न केल्यास वनसंपदा व वन्यजीव यांचे होणारे नुकसान पर्यावरणासाठी घातक ठरणार आहे अगोदरच मानवनिर्मित बेसुमार जंगलतोडीमुळे वने नष्ट होत असल्याचे दिसत आहे..

Post a Comment