श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग....

श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग.

श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील वेगवेगळ्या पक्षांतील अनेक क्रिया -शील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे . यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये चैतन्याचे वातावरण श्रीवर्धन तालुक्यात निरंजन वाडी आणि मामवली ग्रामस्थ मंडळांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे , युवा नेते अनिकेत तटक , श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे , पं . स . सदस्य मंगेश कोमनाक आदिंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळे पक्षाची ताकद तालुक्यात निश्चित वाढली आहे असे मत मंगेश कोमनाक यांनी व्यक्त केले , तसेच अन्य पक्षांत असलेल्या नेते , कार्यकत्यांनीही आपापल्या गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाचे वेळी पक्षाचे वालवटी गणाचे अध्यक्ष परशुराम अडगावले , जगन फडणीस , गुळधे ग्रा . पं . चे सरपंच किसन शिगवण , मेघरे ग्रा . पं . सरपंच स्नेहल पवार , नागेश जाधव , सुनिल कांबळे गुळचे अध्यक्ष किसन शिगवण , मंगेश हुसणे , सचिन हुमणे , सुनिल शिगवण , उद्योगपती महेश पवार आदि मान्यवर उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा