दिवेआगर सवर्ण गणेश मंदिर काम अंतिम टप्प्यात - मुळ गणेश मुर्ता वज़लेप व पुनस्र्थापन कार्यक्रम ; तर सुवर्ण गणेशाचे सोने देखील लवकरच ट्रस्टकडे मिळणार...
दिवेआगर : वार्ताहर
संपुर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून १ कोटी रूपये निधी खर्चेन सुरू असलेले बांधकाम आता पुर्णत्वास येत असून चालु महिन्याच्या अखेरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे तसेच सध्या गणेश मंदिरातील असलेली पुरातन शिवकालीन गणेशाच्या मूर्तीवर वज़लेप आणि मूर्तीची पुनस्र्थापना कार्यक्रम २४ ते २६ मार्चअखेर करण्यात येणार असून मंदिराच्या कलशारोहण देखील यावेळी श्री गणपती देव व पुजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येणार आहे तसेच चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेशाच्या मुखवट्याचे सोने लवकरच शासनाकडून गणपती ट्रस्टकडे मिळणार असून सदर सोन्याची नवीन मूर्ती घडवून सुवर्ण गणेशाचे देखील पुढील कालावधीत पुनस्र्थापना होईल , असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी व्यक्त केला . दिवेआगर सुवर्ण गणेशमंदिरातील मूळ गणेश मूर्ती पुरातन भूसन यापूर्वी सदर मूर्तीची प्रतिष्ठापना अंदाजे १८६५ साला दरम्यान करण्यात आली होती . तिथपासून सदर मूर्तीवर अभिषेक व पुजा केल्याने शेंंदूराचे थर चढले होते . यासाठी सदर मूर्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने संस्कार करून या मूर्तीवर वज्रलेप व त्याच मूर्तीची पुनस्र्थापना करण्याचा कार्यक्रम २४ ते २६ मार्च अखेर करण्यात येणार आहे.
मूर्तीच्या सिंहासनाचे काम सुरू असल्याने मंदिर दर्शनासाठी १९ ते २६ मार्चअखेर बंद ठेवण्यात आले आहे . शनिवार २४ मार्च रोजी सकाळी १० वा . उदकशांती , ५ वा . होमहवन , रविवार २५ मार्च रोजी सकाळी ८ वा . शांतीहोम , सकाळी १० वा . वास्तूशांती व जलाधिवास , दुपारी ४ वा . कळस मिरवणूक , सोमवार २६ मार्च रोजी सकाळी ९ वा . कलशारोहण , सकाळी ११ वा . मूर्ती पुनस्र्थापना व त्यानंतर महाआरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार सुवर्ण गणेशमंदिराचे बांधकाम महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विकास निधीतून १ कोटी रू . निधीतून बांधण्यात येत असून २०१४ पासून सुरू असलेले बांधकाम आता मंदिराचे आतील गाभाच्याचे काही प्रमाणात तसेच विज जोडणी , सीसीटीव्ही कॅमेरा व मंदिराची रंगरंगोटी अशी कामे शिल्लक असून या महिन्याच्या अखेरपर्यंत त्याच पुर्णत्वास येणार असल्याचे चित्र आहे तसेच मंदिरातील सुवर्ण गणेशाच्या दरोड्यामध्ये चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मुखवटयाचे सोने आता गणपती देव आणि पुजेची नेमणूक ट्रस्ट यांचेकडे सुपुर्द करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहखात्याकडून चौकशी पूर्ण झाली असून लवकरच सोने ट्रस्टकडे देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची माहिती गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी सांगितले . त्यादृष्टीने सोने ट्रस्टच्या ताब्यात मिळाल्यानंतर लगेचच सुवर्ण गणेशाची पुनस्र्थापना देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्यामुळे निश्चितपणे दिवेआगर पर्यायाने श्रीवर्धन पर्यटनाच्या बाबत उंच भरारी घेईल असा विश्वास पिळणकर यांनी व्यक्त केला . सुवर्ण गणेशमूर्ती श्री गणपती देव आणि पुजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या अधिपत्याखाली देखभाल करण्यात येत असे व आता ऑगस्ट २०१७ पासून नव्याने कार्यभार हाती घेतलेल्या ट्रस्टचे काम ग्रामस्थांच्या सहकार्यातून जलदगतीने सुरू असल्याने समस्त दिवेआगरसहित श्रीवर्धनकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Post a Comment