म्हसळ्यात आज रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहोळा...
राजीव खांडेकर , किरण नाईक शुभदा जोशी , मिलिंद दुसाणे याचा प्रमुख उपस्थिती
म्हसळा : प्रतिनिधी,
जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपणार्या रायगड प्रेस क्लबचा १३ वा वर्धापन दिन सोहोळा आणि राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहोळा आज २३ मार्च रोजी म्हसळा येथे सार्वजनिक वाचनालय सभागृहात सकाळी ११ . ३० वाजता संपन्न होत आहे . या सोहोळ्याचे संयोजन म्हसळा प्रेस क्लब आणि श्रीवर्धन प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस . एम . देशमुख , यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या सोहोळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ए . बी . पी माझाचे संपादक राजीव खांडेकर , दैनिक सागरच्या संपादक श्रीमती शुभदा जोशी , जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाणे हे उपस्थित राहणार आहेत . या वर्धापन सोहोळ्यात आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार , शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांना कै . निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार पत्रकार जगन्नाथ ओव्हाळ यांना कै . प्रकाश काट्दरे स्मृती निर्भिद्य पत्रकार पुरस्कार पेण येथील पत्रकार प्रदीप मोकल , उत्कृष्ट छायाचित्रकार अलिबागचे समीर माळोदे यांना , युवा पत्रकार पुरस्कार म्हसळ्याचे पत्रकार निकेश कोकचा आणि कर्जतचे पत्रकार कांता हाबळे यांना , सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार महाडच्या पत्रकार मयुरी खोपकर यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उल्का , महाजन यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे . याचवेळी रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघोचहि पुरस्कार वितरण होणार असून त्यामध्ये पनवेलचे पत्रकार सुमंत नलावडे , श्रीवर्धनचे पत्रकार संजय मांजरेकर , माणगावचे पत्रकार गौतम जाधव तसेच पत्रकार भारती घाडगे यांनाहि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

Post a Comment