म्हसळाग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ठोठावले मंत्रालयाचे दरवाजे
आरोग्य मंत्री डॉ . दिपक सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्ताची घेतली दखल , आठ दिवसात पगार देण्याचे दिले वचन
म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालया मधील बारा कर्मचारी वर्गाचा सात महिने पगार झाला नसल्याचे वृत्त म्हसळा Live सह अनेक वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द झाले व त्याच दिवशी म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचान्यांनी मंत्रालयात जाऊन आरोग्य मंत्री डॉक्टर दिपक सावंत , लांजा राजापूर आमदार राजन साळवी , मालवण कणकवलीचे आमदार वैभव नाईक , लांजा शिवसेना शहर प्रमुख गुरूप्रसाद देसाई संचालक डॉ . मोहन जाधव व उप संचालिका डॉ . रावखंडे मॅडम यांची भेट देऊन आपल्या व्यथा मांडल्या त्या संबधीत मंत्र्यांना आपली भूमिका सांगताना ऑगस्ट २०१७ ला रूग्णालय सुरू झाले . त्याच वेळी डॉक्टर नियुक्ती न करता नर्स नियुक्ती केल्या त्यांनीच पाच महिने प्राथमि क आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय सुरू ठेवले परंतू तेव्हा पासून गेली सात महिने स्टाफ नर्स ७ , तंत्रज्ञ १ , कक्षसेवक २ , शिपाई१ सहाय्यक अधीक्षक १ अशा १२ कर्मचारी वर्ग आजही पगाराविना आपली सेवा जनतेला देत आहेत आपला पगार मिळत नाही म्हणून त्यांनी शल्यचित्सक डॉ . गवळी सर , रावखंडे मॅडम अधिक्षक डॉ मधुकर ढवळे या सर्वानचे दरवाजे ठोठावले परंतू आम्हाला आज पर्यंत शाब्दीक अश्वासना पलिकडे काहिच केले नाही . विशेष म्हणजे संबधीत कर्मचारी या रावखंडे मॅडम यांना भेटण्यास गेल्या त्या वेळी त्यांची भेट नाकारली , तुमचा पगार हा दिलेला लिपिक विष्णु साबरे करेल असे सांगुन परत पाठविले , परंतू दिलेला लिपिक हा म्हसळा ग्रामीण रुग्णालय मध्ये हजर असायला हवे पण तो लिपीक अलिबाग रुग्णालयामध्ये काम करतो आहे . त्यामुळे म्हसळा रुग्णालयामध्ये सर्वच ठिकाणी प्रशासकीय कामात वेळोवेळी अडचण निर्माण होत आहे . अशा स्पष्ट शब्दात सांगितले आरोग्य मंत्री डॉ . दिपक सावंत व उपसंचालिका रावखंडे मॅडम यांनी पगार आठ दिवसात करण्याचे वचन दिले . राहिलेल्या काही त्रुटी पूर्ण करण्यासाठी सहाय्यक अधिक्षक सांबारे यांना तात्काळ मंत्रालयात जाण्याचे आदेश दिले संबधीत चर्चा करून येत्या आठ दिवसात उप संचालिका डॉ रावखंडे मॅडम या म्हसळा ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार असल्याचे डॉ . दिपक सावंत यांनी यावेळी सांगितले . आपला पगार मिळत नाही म्हणून चक्क आरोग्य मंत्री यांची भेट घेतली या संदर्भात प्रशासनाचा असणारा हालगर्जीपणाचा पडदा उघडा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे .

Post a Comment