म्हसळ्यात रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहोळा उत्साहात संपन्न

म्हसळ्यात रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहोळा उत्साहात संपन्न



म्हसळा : प्रतिनिधी,
जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपणार्या रायगड प्रेस क्लबचा १३ वा वर्धापन दिन सोहोळा आणि राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहोळा म्हसळा येथे सार्वजनिक वाचनालय सभागृहात  संपन्न झाला. या सोहोळ्याचे संयोजन म्हसळा प्रेस क्लब आणि श्रीवर्धन प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस . एम . देशमुख , यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहोळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ए . बी . पी माझाचे संपादक राजीव खांडेकर , उपस्थित होते. या वर्धापन सोहोळ्यात आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्कार , शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांना कै . निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार पत्रकार जगन्नाथ ओव्हाळ यांना कै . प्रकाश काट्दरे स्मृती निर्भिद्य पत्रकार पुरस्कार पेण येथील पत्रकार प्रदीप मोकल , उत्कृष्ट छायाचित्रकार अलिबागचे समीर माळोदे यांना , युवा पत्रकार पुरस्कार म्हसळ्याचे पत्रकार निकेश कोकचा आणि कर्जतचे पत्रकार कांता हाबळे यांना , सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार महाडच्या पत्रकार मयुरी खोपकर यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उल्का , महाजन यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आले. याचवेळी रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघोचहि पुरस्कार वितरण होणार असून त्यामध्ये पनवेलचे पत्रकार सुमंत नलावडे , श्रीवर्धनचे पत्रकार संजय मांजरेकर , माणगावचे पत्रकार गौतम जाधव तसेच पत्रकार भारती घाडगे यांनाहि पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी म्हसळ्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे ज्येष्ठ पत्रकार विलास यादव , ज्येष्ठ पत्रकार गोविंद पवार यांचाहि विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा वर्धापनदिन सोहोळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय मोकल , उपाध्यक्ष मनोज खांबे , यांच्यासह सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी , सदस्य आणि म्हसळा प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक काते , श्रीवर्धन प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रसाद नाझरे व् दोन्ही प्रेस क्लबचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा