रायगड काँग्रेसची धुरा तरूणांकडे सोपविण्याचे संकेत ; अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य पदी माणिकराव जगताप व अॅड.श्रद्धा ठाकूर

रायगड काँग्रेसची धुरा तरूणांकडे सोपविण्याचे संकेत
अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य पदी माणिकराव जगताप व अॅड.श्रद्धा ठाकूर

मुरूड - अमूलकुमार जैन

अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य पदी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव माजी आमदार माणिक जगताप व रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अॅड.श्रद्धा ठाकूर यांची निवड झाली आहे. रायगड जिल्हयातुन माणिकराव जगताप व अॅड.श्रद्धा ठाकूर यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यंात येत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावतीने राज्यातील 104 नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये रायगड मधुन माणिकराव जगताप व अॅड.श्रद्धा ठाकूर यांचा समावेश आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी हे काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च व्यासपीठअसून या समितीच्या सदस्यांमुधूनच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकार निवडले जातात. खा.राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या यादीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागुन राहीले होते. 
 राज्यातुन निवडण्यात आलेल्या 104 सदस्यांमध्ये सर्वसाधारण 55, इतर मागावर्गीय 22, अनुसूचीत जाती 10, अनुसूचित जमाती 6, अल्पसंख्यांक 11 व 16 महिला प्रतिनीधींचा समावेश आहे. अॅड.श्रद्धा ठाकूर यांनी या निवडीबाबत पक्षाध्यक्ष राहुल गांधी, सोनीयाजी गांधी, प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, माजी आमदार मधुकर ठाकुर, माजी मंत्री रविशेठ पाटील, रायगडमधील सर्व जेष्ठ काॅंग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत. कमी वयात मोठी जबादारी दिली असली तरी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ती पार पाडीन अशी प्रतिक्रीयाही अॅड.श्रद्धा ठाकूर ठाकुर यांनी दिली आहे. अलिबाग तालुक्यातुन प्रथमच अखील भारतीय काँग्रेस कमिटीवर महिला सदस्य म्हणून जाण्याचा मान अॅड.श्रद्धा ठाकूर ठाकुर यांना मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा