म्हसळा नगरपंचायतीच्या विकासासाठी १ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर...
म्हसळा नगर पंचायतीमधील नागरी सुविधा पुरविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ . सुनील तटकरे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र शासनामार्फत १ कोटी ४0 लक्ष रुपयांच्या विकास निधीला मंजुरी मिळाली आहे . मागील आठवड्यात म्हसळा नगरपंचायत हद्दीतील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन २०१७ - १८ अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती न . महाअभियान जिल्हास्तर योजनेसाठी प्रस्तावित कामांतील शहरातील हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण व सुधारण्यासाठी २५ लाख रुपये आणि स्वच्छतागृह बांधकामासाठी १५ लाख रुपये विकास निधी मंजूर झाला आहे . तसेच नव्याने नागरी सुविधा पुरविण्यासाठी नगर विकास विभागामार्फत सहाय्यया योजनेंतर्गत विशेष अनुदान म्हणून १ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे . या निधीचे मंजुरीपत्र जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनी शासकीय निवासस्थानी आयोजित पक्षाच्या कार्यकारिणी आढावा बैठकीत म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कविता बोरकर , राष्ट्रवादीचे नाझीम हसवारे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी बाळ करडे , समीर बनकर , रियाज घराडे सभापती उज्ज्वला सावंत , पंचायत समिती सदस्य संदीप चाचले , सदस्या छाया म्हात्रे आदी उपस्थित होते .

Post a Comment