बोर्ली पंचतन - श्रीवर्धन मार्गावरील झुडुपे हटवली...

बोर्ली पंचतन - श्रीवर्धन मार्गावरील झुडुपे हटवली...
दिघी: गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन - श्रीवर्धन मुख्य रस्ता हा सर्वाधिक रहदारीचा भार असलेला मार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते . मात्र , यारस्त्याला झुडुपांच्या पसरलेल्या साम्राज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता . युवासेनेच्या निवेदनामुळे जाग आलेल्या सा . बां . विभागाच्या अधिकार्यांनी खुर्चा बाजूला सारत झुडुपे साफ केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी रस्त्या लागतची झाडेझुडुपे हटवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम अधिकारी व्ही . एन . गायकवाड यांना श्रीवर्धन - बोल रस्त्यावरील झुडुपे तोडण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते . श्रीवर्धन - बोर्ली मार्ग हा १७ किमी अंतराचा घाट रस्ता अत्यंत अरुंद आणि वळणावळणाचा आहे . रस्ता डोंगरभागातून गेला आहे . आजूबाजूला डोंगरदऱ्या असल्याने पावसाळ्यापासून वाढलेली झाडेझुडुपे अद्यापही हटविण्यात आली नसल्याने अपघाताची शक्यता होती . बांधकाम विभागाची डोळेझाक होत असल्याने हि बाब प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरत होती . याच रस्त्याने श्रीवर्धन आगारातून बोर्ली, माणगाव, मुंबई , पुणे आदी लांब पल्ल्याची एसटी वाहतूक व प्रामुख्याने या रस्त्याचा वापर रत्नागिरी जिल्हा बाणकोट खाडीतील जलप्रवास ( फेरी बोट ) करणाच्या पर्यटक व नागरिकांना श्रीवर्धन , दिवेआगर , मुरुड , अलिबाग या ठिकाणी जाण्यासाठी होतो . अत्यंत महत्वाचा असा हा मार्ग असल्यामुळे या रस्त्याला वाहनांची ये - जा मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र आता या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा