महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व सेवासंचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी खेळाचा दर्जासुधारण्या साठी व राज्यक्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राहावे. नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी व खेळाडूंकरीता क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा याबाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हितावह योजना राज्यात राबविण्यासाठी क्रीडा धोरण जाहीर करण्यात आले आहे. क्रीडा सुविधा, साहसी खेळांची सुविधा, जलतरण तलाव, वुडनसिथटिक फ्लोरिंगचे बॅडमिंटन, टेनिस व्हॉलीबॉल कोट, वेलोड्रम, शुटिंगरेंज, ॲस्ट्रोटर्फ हॉकी इत्यादी क्रीडांगणे, विविध खेळांचे क्रीडा साहित्य ॲथलॅटिक्स, फुटबॉल, हॉकी, टेनिस, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग,कुस्ती, व्हॉलीबॉल, खो-खो, बॉक्सिंग, रस्सीखेच, हॅन्डबॉल,जलतरण, जिम्नॅस्टिक, कबड्डी, बास्केटबॉल, टेबलटेनिस, ज्युदो, तायक्वांदो, कराटे, मल्लखांब, रोपमल्लखांब, शुटिंगटेनिसक्रीकेट, मल्टिजिम, ट्रेडमिल, सायकलिंग अद्यावत व्यायाम साहित्य इ. याचा लाभ शैक्षणिक संस्था, खाजगीक्लब, क्रीडामंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडाविभागाच्या शासन निर्णय करण्यात आलेला आहे. या अनुदानयोजनेअंतर्गत ज्यांना अनुदानासाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामधून अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. दि. 5 एप्रिल पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दोन प्रति मध्ये आपला प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 1 मार्च 2014 चा शासननिर्णय पहावा. रायगड जिल्हातील अधिकाधिक संस्थांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड नेहुली-संगम अलिबाग येथे संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
क्रीडा सुविधांना आर्थिक सहाय्य अनुदान योजना
Admin Team
0
Post a Comment