कोळे ग्रामपंचायतीचा कारभार पारसमणी सारखा स्वच्छ :
तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या भ्रष्ट ग्रामपंचायतीची चौकशी लावण्याची हिम्मत दाखवावी : सरपंच अमोल पेंढारी यांचा प्रतिउत्तर
म्हसळा : निकेश कोकचा
कोळे ग्रामपंचायतीचा कारभार पारसमणी सारखा स्वच्छ :तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या भ्रष्ट ग्रामपंचायतीची चौकशी लावण्याची हिम्मत दाखवावी:सरपंच अमोल पेंढारी यांचा प्रतिउत्तर .गावाची होणारी प्रगती विरोधक तटकरे कुटुंबियांना डोळ्यात भुरळ घालणारी असल्यानेच त्यांनी माझी ना हक बदनामी करण्याचा डाव आखला असल्याची माहिती कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच आमोल पेंढारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.आमदार सुनील तटकरे यांनी २७ मार्च रोजी कोळे ग्रामपंचायतीमध्ये डिसेंबर २०१४ पासून मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार चालत असल्याची लक्षवेधी सभागृहात मांडली होती.या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री दादा भुसे यांनी ग्राम्पांच्यात गैरव्यवहार प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहाला दिले होते.
लग्नाआधी ज्या तरुणीने निविदा देऊन काम घेतले त्याच मुली सोबत माझे लग्न होणार अशी अशी भविष्यवाणी झाली न्हवती.या कामाशी ग्रामपंचायतीचे कोणतेही संबंध नसून हे पैसे संस्थेच्या नावावर आले होते. ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही पैसे आले नाहीत. तटकरे यांनी जमा खर्चाच्या नोंदी बाबत देखील प्रश्न उपस्थित केला असून मी त्यांना सांगू इच्छितो की जमा खर्चाची नोंद ठेवणे हे सरपंचाचे काम नाही. तुमच्या ताब्यात असणाऱ्या भ्रष्ट ग्रामपंचायतीचे जमा खर्च सरपंच ठेवत असले तर त्या बाबत आम्हाला माहित नाही अशी प्रतिक्रिया सरपंच पेंढारी यांनी दिली आहे.
सभागृहात पाणीपुरवठा योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला असून अभ्यासू तटकरेना एकच विनवणी सांगतो की,कोळे ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कुठलाच काम आलेला नसून त्याबाबत कोणतेही पैसे ग्रामपंचायतीने खर्च केलेले नाहीत.आ.सुनील तटकरे यांनी कोळे ग्रामपंचायत बाबत सभागृहात मांडलेले सर्व प्रश्न निरर्थक असून मी त्यांच्या भ्रष्ट्वादी पक्षात गेलो नाही म्हणून ते मला ना हक दबावाखाली आणण्याच्या प्रयत्न करून बदनाम करत असून आपण शासनाच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.आमदार सुनील तटकरे यांनी म्हसळा नगरपंचायत सहित तालुक्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करावा असा सल्ला देखील दिला.

Post a Comment