नगरपंचायतीचे हिटलरशाही व बेजबाबदार मुख्याधीकारींची म्हसळा शहरातून हकालपट्टी केली जाईल:नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची घोषणा

नगरपंचायतीचे हिटलरशाही व बेजबाबदार मुख्याधीकारींची म्हसळा शहरातून हकालपट्टी केली जाईल:नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांची घोषणा 

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर काही कालावधीतच कायमस्वरूपी मुख्याधिकारी पदी तरुण असलेले वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या समस्या सुटणार अशी आशा म्हसळावासियांमध्ये जागृत झाली होती.मात्र आपल्या अर्थपूर्ण फायद्यासाठी शहरामध्ये बेकायदेशीर बांधकामांना मागील ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर परवानगी देणे,नगरपंचायतीने काढलेल्या कचरा निविदांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची शक्यात असणे ,आठवड्यातून ३ ते ४ दिवस कामावर हजर राहणे,शहरातील नागरिकांना दादागिरीच्या भाषेत उत्तर देणे, आपल्या कार्यालयाबाहेर नागरिकांना भेटण्याची वेळ मुंबई पालिका एवढा कारभार असल्याप्रमाणे दिवसभरातून दोन तास निश्चित करणे व नगराध्यक्ष व इतर सभापती यांनी सुचवलेले काम टाळणे या स्वभावामुळे आमदार सुनील तटकरे यांनी अधिवेशनामध्ये मुख्याधिकारी यांच्या कामाबाबत हरकत घेऊन प्रश उपस्थित केला.या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सदर मुख्याधिकारी यांची बदली केली जाईल असे आश्वासन दिले.ना.पाटील यांच्या या निर्णयाचे’ नगरपंचायत मध्ये असणाऱ्या नगरसेवकांसहीत सर्व शहरवासीयांनी स्वागत केले. अशा बेजबाबदार मुख्याधिकारी यांची बदली तर झालीच पाहिजे मात्र त्यांच्या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी देखील झाली पाहिजे या अर्थानेच ही बदली योग्य ठरेल अशी मागणी आता शहरातून पुढे येऊ लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा