दिघी पोर्ट संचालकां विरोधात गुन्हा,
कामाला आणलेल्या मशिनरीची परस्पर विक्री व फसवणूक
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदर च्या संचालकां विरोधात श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदारांच्या कामासाठी आणलेल्या मशिनरीची परस्पर विक्री व फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याबाबत रायगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथील साईट वर दिघी बंदराच्या लँड डेव्हलपमेंट चे काम सुरू होते. यासाठी 2010 साली दिघी पोर्ट ने पुंज लॉइंड या कंपनीला कंत्राट दिले होते. मुख्य कंत्राटदार असलेल्या पुंज लॉइंड कंपनी ने आरुष इंजिनिअरिंग या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यासाठी आरुष इंजिनिअरिंग ने आवश्यक साधने दिघी पोर्ट च्या आवारात आणली होती. त्यानंतर पोर्ट चे काम करण्याचे साडे सात कोटी रुपयांची बिले आरुष इंजिनिअरिंग ने पोर्ट चे मुख्य कंत्राटदार असलेल्या पुंज लॉइंड कंपनी कडे दिलेली मात्र 2012 साली दिघी पोर्ट संचालक व पुंज लॉइंड कंपनी यांच्यात वाद होऊन दोघांतील कंत्राट संपुष्टात आले. या वादात आरुष इंजिनिअरिंग चे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येताच आरुष ने दिघी पोर्ट कडे पैशाची मागणी केली. अनेक वेळा रीतसर मागणी करून देखील पैशाची पुर्तता ना केल्याने कायदेशीर मार्गाने लढत असल्याचे फिर्यादीचे वकील राम धायेरकार व जयदीप ठक्कर यांनी सांगितले. आरुष इंजिनिअरिंग ने दिघी पोर्ट विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे. जागेतील मशिनरी त्यांनी कर्ज घेतलेल्या अर्थसहाययक एजन्सी ने नेल्या आहेत. आम्ही कोणतेही पैसे थकवले नसल्याचे दिघी पोर्ट चे विजय कलंत्री यांनी सांगितले. तर फायनान्स चे कोणतेही कर्ज नसल्याचे फिर्यादी चे वकील धायेरकर यांनी सांगितले.
# साडे सात कोटींसाठी करारनामा -
केलेल्या कामाचे साडे सात कोटी रुपयांचा व्यवहार करण्यास साठी दिघी पोर्ट चे संचालक विशाल कलंत्री व आरुष इंजिनिअरिंग चे संचालक सीताराम वाघमोडे यांच्यात 16 जून 2013 रोजी रोजी समझोता करार झाला. बिलातील साडे सात कोटी पैकी चार कोटी पंच्याहत्तर लाख एवढीच रक्कम दिली तर उर्वरीत दोन कोटी पंच्याहत्तर लाख रक्कम न देता फसवणूक केल्याचा आरोप करत आरुष इंजिनिअरिंग कडून लक्ष्मण जखगोंड यांनी दिघी सागरी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
# पाच वर्षे मागणी -
दिघी पोर्ट च्या जागेत कामासाठी ठेवण्यात आलेले साहित्य परत मिळवण्यास अनेक वेळा आरुष इंजिनिअरिंग कडून पत्राद्वारे व भेटीद्वारे मागणी करण्यात आली मात्र पोर्ट प्रशासन कडून साहित्य देण्यासाठी नकार दिला. साईट वरील जागेतील आरुष इंजिनिअरिंग चे साहित्य दिघी पोर्ट ने परस्पर विकल्याचा आरोप फिर्यादी जखगोंड यांनी तक्रारीत केले आहे.
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर प्रकल्प या ना त्या प्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडत आहे. महसूल न भरल्याने मागील वर्षी श्रीवर्धन तहसीलदारांनी दिघी पोर्ट वर जप्तीची कारवाई केली होती.
# क्रेन ची विक्री 14 लाखांना -
यापूर्वी देखील दिघी पोर्ट येथे कामाला आणलेल्या दोन क्रेन परस्पर चौदा लाखांना पुणे येथे विकल्याच्या घटना घडली होती. याबाबत दिघी पोर्ट प्रशासन वर गुन्हा दाखल झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Post a Comment