रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवड येथे जागतिक वन दिन साजरा
दिनांक २१ मार्च २०१८ रोजी दुपारी २.३० वाजता रायगड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवड येथे आधार फाऊंडेशन आणि वनविभाग
म्हसळा (कोंझरी बिट) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन साजरा
करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री मंगेश
जी मुंडे साहेब वनपाल श्री बाळकृष्ण गोरनाख साहेब सामाजिक कार्यकर्ते
श्री जयसिंग बेटकर, वनरक्षक भिमराव सुर्यतळ, एस एस पवार शाळेचे
मुख्याध्यापक हनुमंत झाटे सर, सहशिक्षक काकडे सर, कृणाल करंबे, गाव
अध्यक्ष घडशी साहेब, मुबंई अध्यक्ष गोरिवले साहेब जेष्ठ भागोजी ठोंबरे
आणि ग्रामस्थ व महिला मंडळ सांगवड उपस्थित होते चित्रकला स्पर्धेत
प्रथम क्रमांक सच्चित संदिप ठोंबरे, द्वितीय क्रमांक रिया शुभाष
गोरिवले, तृतीय क्रमांक श्रेयश विनोद येले, उत्तेजनार्थ हेमांगी संतोष
घडशी, जानवी राजु घडशी यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि
प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आणि सहभागी विद्यार्थीना प्रमाणपत्र व
मेडल देऊन गौरविण्यात आले. . .
मंगेश जी मुंडे साहेब आणि गोरनाख भाऊसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन सुर्याजी काकडे सर यांनी केले आभार प्रदर्शन हनुमंत
झाटे सर यांनी केले . सांगवड शाळेत व गावात वन्य सप्ताह जुलै महिन्यात
येत्या राबविण्यात येणार आहे तसेच महिला सक्षमीकरण साठी वनविभागाच्या
मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे गोरनाख भाऊसाहेब यांनी पुढील
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment