श्रीवर्धन : अखेर श्रीवर्धन शहरातील दुर्लक्षीत देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून क्रांती यज्ञात देश स्वातंत्र्या साठी जीवन समर्पित करणाच्या क्रांतिवीरांच्या स्तंभाचा विसर विद्यमान प्रशासकीय व्यवस्थेला पडल्याचे निदर्शनास आल्या वर दैनिक पुढारी ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते . करोड़ रुपयाचा अर्थसंकल्प सांडणार्या श्रीवर्धन नगरपालिकेचे लक्ष्य क्रांतिस्तंभाकडे वेधावे लागले . स्वातंत्र्य प्राप्तच्या २५ वर्ष पूर्तीच्या प्रीत्यर्थं क्रांतिस्तंभाची स्थापना सोमजाई देवस्थानच्या पटांगणात करण्यात आली . कालपरवापर्यंत क्रांतिस्तंभाची अवस्था अतिशय वाईट झाली होती सदर प्रश्नं श्रीवर्धन मधील तरुणांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता . विद्यमान नगरपालिका विरोधी पक्ष नेते यांनी १३ मार्ज रोजी नगरपालिकेस क्रांतिस्तंभ दुरुस्ती संदर्भात पत्र दिले होते . त्या नंतर नगरपालिकेने १५ हजार २२३ रुपयाची तरतूद केली . सदरचे कंत्राट सुद्धा देण्यात आले होते परंतु काम सुरू झाले नाही पुढारी दैनिकाने सदर चे वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर दुसर्या दिवशी क्रांतिस्तंभाच्या कामास प्रारंभ झाला . त्यामुळे नागरिकांतून स्वागत होत आहे .
श्रीवर्धनमधील क्रांती स्तंभाचे काम सुरू...
Admin Team
0

Post a Comment