पानवे ते केलटे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट | ठिकठिकाणी ठेवल्या गाळलेल्या जाणा ; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील पानवे ते केलटे रस्त्याच्या डांबरीकरणात ठेकेदाराने डांबरी कार्पेट टाकताना रस्त्यावर गाळलेल्या जागा ठेवलेल्या दिसत आहेत . या सर्व प्रकारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र सपशेल दुर्लक्ष होत असून , अधिकारी , ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप या विभागातील ग्रामस्थ करीत आहेत . म्हसळा तालुक्यातील अनेक वर्षे मागणी असलेल्या रस्त्यांपैकी एक म्हणजे पानवे ते केलटे या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी सुरु झाले . याच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तब्बल एक वर्षोंने सुरु झाले . त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाच्या नागरिकांना दिलासा मिळाला होता . परंतु या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या रस्त्यावर डांबरी कापेंटचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे असे निदर्शनास येत आहे या रस्त्यावरचे डांबरी कापेंटचा थर हा इतका कमी जाडीचा आहे की त्यावरून एखादे वाहन गेले असता हे डांबरी कार्पेट निघून जात आहे . त्यामुळे निघून गेलेल्या डांबरी कार्पटमुळे तयार झालेल्या या गाळलेल्या जागा भरणार कोण ? असा प्रश्न उपस्थित होते आहे एकीकडे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे उत्तम दर्जाचे रस्त्याचे काम करण्याचा सर्वत्र दावा करीत असताना म्हसळा तालुक्यातील रस्त्यांकडे मात्र शासनाचे अति महत्वाचे खाते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अक्ष्यम्य दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आज पानवे केलटेच्या रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने पहावयास मिळत आहे यासंदर्भात बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही .

Post a Comment