म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण व सुधारण्यासाठी २५ लाख रुपये आणि स्वच्छतागृह बांधकामासाठी १५ लाख रुपये असा ४0 लाखांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ . सुनील तटकरे यांच्या शिफारशीने जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन २0१७ - १८ अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला या कामांच्या प्रशासकीय मंजुरीचे पत्र म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कविता बोरकर , म्हसळा तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नाझीम हसवारे यांच्याकडे ना . सुनील तटकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नसतानाही गेल्या दोन वर्षांत तटकरे यांनी म्हसळा शहराचे विकासाकरिता शासनाचे वेगवेगळ्या विकास निधींतून वीज रस्ते , पाणी , स्वछता आणि सार्वजनिक बांधकामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध केला आहे या मंजुर निधीपैकी अनेक कामे पूर्ण तर काही कामे शासन मंजुर आहेत . मंजुरी कामांमध्ये पावणे तीन कोटी रुपये खर्चाची पाभरे धरण नळ पाणी पुरवठा योजना , नगरपंचायत शासकीय इमारत , डांबरी रस्ता , गटार बांधकाम आदी छोट्या मोठ्या कामांचा समावेश आहे यामध्ये आणखी ४0 लाख रुपये विकास निधीची भर होऊन शहर बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी स्वछता गृहाचे बांधकामासाठी १५ लाख रुपये आणि हिंदू स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी २५ लाख रुपये खर्चाच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे . यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे , अनिकेत तटकरे , नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे , उपनगराध्यक्ष नासीर दळवी , माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे , गटनेते संजय कर्णिक , तालुका उपाध्यक्ष भाई बोरकर , शहर युवक अध्यक्ष नईम दळवी , सभापती संतोष काते , नगरसेविका सेहनाझ हुजूक , नगरसेवक अबू राऊत , मुसीक हुज़्क आदी उपस्थित होते .

Post a Comment