म्हसळयात शिवसेने बरोबर काँग्रेस पक्ष करीत असलेली हातमिळवणी ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस द्वेषाची काविळ झाल्याने - सुनिल तटकरे
म्हसळा-वार्ताहर
धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे लढवणार अशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असताना म्हसळा तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात काँग्रेसपक्ष स्थानिक निवडणुका शिवसेने सोबत हातमिळवणी करून लढवत आहे ही केवळ त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या द्वेषाची काविल झाल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथे शिवसेनेचे माजी विरोधी पक्ष नेते सुभाष उर्फ बालशेठ करडे यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात केली.तटकरे यांनी सेना काँग्रेस युती बाबत सांगतना या पुर्वी आमचे पक्षात काम करीत असलेले काही कार्यकर्ते सतत अस्थिर असल्याने काँग्रेस पक्षाचे विचारसरणीला न पटणारी युती करीत आहेत तर याऊलट राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात व केंद्रात सत्तेत नसताना शहर,गाववाडी वस्तीवर विकास करीत आहे ही मोठी तफावत आसुन विकासासाठी शिवसेनेचे जेष्ठ मार्गदर्शक बाळशेठ करडे आणि माजी तालुका प्रमुख समीर बनकर यांनी आमचे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचे पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणुन स्वागत व आभार मानतो.त्यांच्या स्वागतासाठी माझ्या पक्षातील कार्यकर्तेही आतुरलेले होते तो दिवस आज उजाडल्याचे तटकरे यांनी आवर्जुन सांगितले.रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यात मोठे राजकीय स्थित्यंतर झाल्याने तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणारा क्षण असल्याचे सांगितले.करडे आणि बनकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून वैचारिक भूमिका घेत पक्ष संघटना वाढीचा काम केला परंतु शिवसेनेत त्यांचा व्यक्तीगत संघर्ष झाला नसुन वैचारिक संघर्ष झाल्याने केवळ विकास हाच मुद्दा पकडुन आमच्या पक्षात प्रवेश केला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आमचे पक्षात जिल्ह्यात व तालुक्यात त्यांचे जेष्ठत्वाचा मान दिला जाईल असे सांगितले.पत्रकार वार्तालाप व पक्ष प्रवेश कार्यक्रमाला युवक नेते अनिकेत तटकरे, पक्षाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे,जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर,तालुका प्रमुख नाझीम हसवारे,जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे,जि.प.सदस्या धनश्री पाटील,सभापती उज्वला सावंत,उपसभापती मधुकर गायकर,पं.स.सदस्य संदीप चाचले, उपनगराध्यक्ष नासिर दळवी,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,गटनेते संजय कर्णिक,युवक अध्यक्ष फैसल गीते,संतोष पाखड,शहर अध्यक्ष रियाज घराडे,उपाध्यक्ष चंद्रकांत कापरे,शहर युवक अध्यक्ष नईम दळवी,भाई दफेदार,भाई बोरकर,जि. प.माजी प्रतोद वैशाली सावंत,बापु विचारे, व्यंकटेश सावंत,नगरसेवक करण गायकवाड,नगरसेविका जयश्री कापरे,लक्ष्मण कांबळे,अनिल बसवत,प्रकाश करडे,योगेश करडे,बाळ साळुंखे,समीर काळोखे, प्रकाश गाणेकर,मुसद्दीक इनामदार,संजय खताते आदी मान्यवर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
● आमदार सुनिल तटकरेंच्या म्हसळा येथील पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते,रा.जि. प.माजी विरोधीपक्ष नेते बाळशेठ करडे आणि माजी तालुका प्रमुख समीर बनकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे त्यांचा येथीचीत स्वागताचा कार्यक्रम रोह्यात होणार असल्याचे आमदार तटकरे यांनी सांगताना या दोन पदाधिकारी यांच्या पक्ष प्रवेशामुळे आम्हाला काम करण्याचे बळ मिळाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी,ध्येयवाद,विकासाभिमुख काम करण्याची नितीने जिल्ह्यात व तालुक्यात न्याय मिळवून दिला जाईल असे सांगितले.पत्रकारांनी विकासाचे मुद्यावर पक्षप्रवेश होत आहेत की कसे यावर तटकरे यांनी रायगडचे खासदार अनंत गीते यांचेवर टिका करताना निष्क्रीय केंद्रीयमंत्री गीते यांच्या मुळे मुंबई गोवा राज्यमार्गाचा विकास रखडलेला असल्याने आज होळीच्या सणाचे दिवसात ट्रॅफीक जॅम होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाले पासुन सातत्याने15 वर्षे मी सत्तेत होतो परंतु आता चार वर्षे सत्तेत नसतानाही रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत असल्याचे आमदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
*जनतेसाठी विकास करणारे नेते सुनिल तटकरे यांचा आम्हाला आधार आणि आदर आहे जसे निष्ठेने सेनेत काम केले त्याच निष्ठेने या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करणार असे बाळशेठ करडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.**
**वयाच्या 17 वर्षा पासुन शिवसेनेत सामाजिक विकासासाठी मा, बालशेठ करडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राजकीय कामाला सुरुवात केली परंतु शिवसेनेत निष्ठवंतांना किंमत राहिली नाही या पुढे सेनेच्या जेष्ठत्वावर कोणतीही टिका टिपण्णी करणार नाही परंतु खासदार अनंत गीते ते तालुका प्रमुख यांचा राजकीय समाचार घेणार असे माजी तालुका प्रमुख समीर बनकर यांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमात वार्तालाप करताना सांगितले.

Post a Comment