म्हसळा शिवसेनेला पडले खिंडार :
माजी उपजिल्हाप्रमुख बाळ करडे , समीर बनकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित..
म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा तालुका शिवसेनेला खिडार पडले असून म्हसळ्याचे माजी तालुकाप्रमुख समीर बनकर , तालुक्याच्या हिंदू समाजाचे विद्यमान अध्यक्ष , शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख , जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुभाष उर्फ बाळ करडे यांच्यासह तालुक्यातील अनेक शिवसैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसम ध्ये प्रवेश निश्चित झाला आहे . त्याच अनुषंगाने निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी करडे यांच्या निवासस्थानी आज ( दि . ३ ) पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे . माजी तालुकाप्रमुख समीर बनकर यांची व अन्य काही जणांची शिवसेनेतून काही महिन्यांपूर्वी हाकलपट्टी झाली होती . मात्र नंतर झालेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा तालुक्यात दारुण पराभव झाला होता . त्यामुळे बनकर व त्यांचे समर्थकांना पुन्हा शिव सेनेत प्रवेश मिळेल असे वातावरण असतानाच जिल्हा व तालुक्यातील नेतृत्वाकडून योग्य संकेत मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर बनकर व त्यांचे समर्थकानी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले . याचवेळी शिवसेनेच्या तालुका नेतृत्वाला कंटाळलेले बाळ करडे यांनीही शिवसेना सोडण्याची निश्चित भूमिका घेतली . तालुक्यातील अनेक शिवसैनिकांचा बनकर - करडे यांच्या धोरणाला पाठींबा असल्याने आज होणार्या पत्रकार परीषदेत कार्यक्रमाची रुपरेषा व अन्य धोरणांची निश्चिती होणार आहे पक्षाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या रोहा येथील कार्यक्रमात जाहीर पक्ष प्रवेश होणार आसल्याचे समजते . तालुका हिंद समाजाचे अध्यक्ष असलेले बाळ करडे व माजी तालुका प्रमुख बनकर यांच्या निर्णयामुळे तालुक्यात शिवसेना पिछाडीवर जाईल , असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे बनकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनेत मोठेपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे .

Post a Comment