91 व्या सत्याग्रहदिनी निजामपूर ते महाड भीमज्योतीचे आयोजन...

91 व्या सत्याग्रहदिनी निजामपूर ते महाड भीमज्योतीचे आयोजन

माणगाव : प्रवीण गोरेगांवकर |

दक्षिण रायगडचे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या पुढाकाराने निजामपूर येथील आम्रपाली मित्रमंडळाने महाड येथील चवदार तळयाच्या 91 व्या सत्याग्रह दिनी निजामपूर ते महाड भीम ज्योतीचे आयोजन केले होते. यावेळी निजामपूर पासून महाडपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळयाचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च रोजी केला होता. या दिनाचे औचित्य साधून 91 व्या सत्याग्रहाच्या निमित्ताने निजामपूर येथील बुद्धविहारात  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी निजामपूर येथील आम्रपाली मित्रमंडळाचे विविध पदाधिकारी, मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, नानचंद सावंत, रामदास सावंत, सतिष जाधव, भिम सावंत, बाळाराम सावंत, सुंदर गायकवाड, महिला मंडळ व मुंबईकर मंडळ मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

यावेळी निजामपूर येथील आम्रपाली मित्रमंडळाने क्रांतीदिनी निजामपूर ते महाड 45 कि.मी अंतराचे भितज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हि भव्य शोभायात्रा निजामपूर बाजारपेठ, माणगाव बाजारपेठेतून लोणेरे मार्गे महाड क्रांतीस्तंभावर पोहोचली. भारतरत्न डॉ. आबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळयात सत्याग्रह करीत तळयातील पाणी सर्वांसाठी खुले केले. या चवदारतळे सत्याग्रहाचा 91 वा वर्धापन दिन निजामपूर येथील बौद्ध बांधवांनी साजरा केला. त्यावेळी निजामपूर येथील महिला मंडळ, तरूण वर्ग व मुंबईकर मंडळ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी बौद्ध बांधवांना एकत्र करीत एकीचा संदेश दिला व आम्रपाली मित्र मंडळ स्थापन करून निजामपूर ते महाड भीमज्योतीचे आयोजन करीत शोभायात्रा काढली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा