आमदार साहेब , सांगा आमसभा होईल केव्हा ? श्रीवर्धन , म्हसळ्यात ५ वर्षे आमसभाच नाही

आमदार साहेब , सांगा आमसभा होईल केव्हा ? श्रीवर्धन , म्हसळ्यात ५ वर्षे आमसभाच नाही
आमदार साहेब , सांगा आमसभा होईल केव्हा ? श्रीवर्धन , म्हसळ्यात ५ वर्षे आमसभाच नाही 

आमसभेची मागणी रेंगाळलेल्या प्रश्नांसाठी कामचुकार अधिकारी व कर्मचाच्यांविरोधात आमसभेसारख्या गंभीर महत्वपूर्ण कामकाजाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करीत आहेत , असे प्रश्न सामान्य जनता विचारात आहेत . गेली ५ वर्षे श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याची आमसभा झाली नाही . 

दिघी: वार्ताहर
तालुका पंचायत समित्यांच्या वार्षिक आमसभा म्हणजे ग्रामीण विकासाची ब्ल्यू प्रिंटच आहे मात्र , या सभा घेण्यात पंचायत समित्यांमध्ये उदासिनता दिसून येत . आहे श्रीवर्धन मतदार संघातील पंचायत समिती कडून तालुक्यात गेली ५ वर्षे आमसभा घेतली गेली नाही . परिणामी , जिल्हा परिषदेला तालुक्याच्या ग्रामीण भागातील आम ग्रामस्थांच्या विकासाबाबतच्या आशा आकांक्षा कोणत्या हे कळू शकलेले नाही राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे पंचायत समित्यांनी किमान वर्षातून एक आमसभा घेणे बंधनकारक आहे . पंचायतराज समितीची तर अशा सभा न चुकता घेण्यात याव्यात अशी सूचना आहे . त्यामागे पुढील वर्षाच्या विकासाच्या कामकाजाची आखणी करण्यापूर्वी ही सभा घेणे महत्वाचे आहे . या आमसभांमध्ये मुख्यतः कोणते विषय चर्चेला घ्यावेत , याविषयी आगाऊ सूचना खासदार , आमदार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य , सर्व सरपंच , उपसरपंच , सदस्य , विविध कार्यकारी संस्था , अन्य सहकारी संस्था , विविध समाजांचे प्रमुख घटक आदींकडून मागून घेऊन त्यांच्या अनुरोधानुसार आमसभेचे कामकाज पूर्ण करावे . सर्व पंचायत समित्यांच्या आमसभा व त्यांचे अहवाल आल्यानंतरच जिल्हा परिषदेने वार्षिक आमसभा घ्यावी , असा नियम आहे मात्र या नियमाकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष झालेले आहे आमदार हे आमसभेचे अध्यक्ष असतात तर पं . स . चे सभापती हे उपाध्यक्ष असतात . श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन , म्हसळा रोहा व तळा अशी चार तालुके आहेत . रोहा व तळा तालुक्यातील काही भाग हा पेण मतदार संघात आहे जिल्हा स्तरीय आमसभा - पंचायत समित्यांनी वार्षिक आमसभा घ्यावी व त्यात झालेल्या कामकाजाचा अहवाल त्वरित पाठवावा , असे आवाहन जिल्हा परिषदेला करते . पंचायत समित्यांची सभा झाल्याशिवाय जिल्हास्तरावरील जिल्हा आमसभा जिल्हा परिषदेला घेता येत नाही , तरतूद आहे . मात्र , त्यानंतरही काही पंचायत समित्यांची सभा वर्ष उलटल्यानंतरही होत नाही . अस असताना देखील जिल्हास्तरीय आमसभा होते की , नाही याबद्दल साशंकता उपस्थित केली जात आहे.


टिपण्णी पुन्हा पाठवूतालुक्यातील आमसभा का होत नाही याबाबत म्हसळा तालुक्यातील विस्ताराधिकारी वाय . एम . प्रभे व श्रीवर्धनच्या विस्ताराधिकारी पूजा गमरे यांना संपर्क केला असता , आमसभा प्रलंबित असल्याची टिपण्णी आमदारांकडे पाठवतो . मात्र आमसभेची तारीख मिळत नसल्याचे सांगितले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा