कोकण च्या सौदर्यांत भर टाकतात ते कोकणातील समुद्र किनारे, पण बहुतांशी किनार्यांचा श्वास हा अस्वच्छतेच्या विळख्यात गुदमरताना दिसतो. समुद्रात अनेक प्रकारे घाण टाकून जलप्रदूषण केले जाते.
तसेच किनार्यावर हवा खायला व मजा करायला येणार्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा केला जातो. तेव्हा, समुद्रकिनार्यांचा अनेक
प्रकारांनी लाभ घ्यायचा असेल, तर प्रशासनाने व नागरिकांनी नीट लक्ष
घालून ते किनारे स्वच्छ करायलाल हवेत.
कोकणातील वेळास बीच हे हि पर्यटकांचे मुख्य आकर्षण. बीच वर वाढणार घाणीच साम्राज्य वेलास च्या तरुणांना खटकत होत. याची वेळेत साफ सफाई झालीच पाहिजे असा तरुणीला वाटत होत. आणि मग त्यातूनच हेल्प ग्रूप च्या धवल तवसळकर यांनी हेल्प ग्रूप च्या मदतीने स्वच्छतेचेमहत्व नागरिकांना पटवून दिले. आणि महाविद्यालयीन विद्याथी व गावकर्यांच्या मदतीनेवेळास बीच स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेऊन चार ते सात या वेळेते पूर्ण बीच साफ केले.

Post a Comment