शिवसेनेतून गेलेत त्यांचा विचार करू नका - नंदू शिर्के
म्हसळा : प्रतिनिधी
जे आपल्या स्वार्थासाठी शिवसेना ली सोडून गेलेत त्यांचा विचार करू नका असे कळकळीचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख नंदु शिर्के यांनी कार्यकर्यांना केले आहे . तसेच शिवसेनेनी ज्यांना पदे देऊन मोठे केली तेच आज शिवसेना संपवण्याची भाषा करतात यासारखे दुसरे दुर्दैव काहीच नाही . म्हसळा तालुक्यातील शिवसैनिक अजूनही शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत . त्यामुळे त्यांना खोटी आमिषे दाखवून फसवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी देहेन येथील होळीचे पटांगण ते गावातील रस्त्याचा काम च्या व रातिवणे येथे सभामंडप बांधणे या कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना दिला आहे . यावेळी तालुका प्रमुख नंदू शिर्के यांचे समवेत उपतालुका प्रमुख अनंत कांबळे , संपर्क प्रमुख गजानन शिंदे , अमित महामुनकर , पांडुरंग सुतार सरपंच राजाराम तीलटकर , संजय जाधव , देहेन गाव अध्यक्ष धोंडू आलीम , मीनाक्षी जोशी ग्रामपंचायत सदस्य रावजी घाणेकर , अनिल जोशी उपस्थित होते यावेळी उपस्थित गावकच्यांनी आम्ही अजूनही शिवसेनेच्या पाठीशी उभे आहोत असे ठामपणे सांगितले .

Post a Comment