मुरुडच्या होलिकोत्सवाला ३०० वर्षांची परंपरा..
मुरुड - जंजिरा प्रकाश सत्रे
कोकणातील " शिमगा ’ म्हणजे होळी सर्व महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द आहे ठिकठिकाणी या सणाच्या पारंपारिक पध्दती पाहायला मिळतात . ग्रामदेवतेची पालखी नाच विण्याची प्रथा अजूनही सुरु आहे अनीशी कृतज्ञ राहण्यासाठी साजरा होणाच्या होलिकोत्सवाला यामुळेच पुराण काळापासून महत्व आहे रायगडातील मुरुड - जंजिरा येथिल कोळीवाडयांतील होलिकोत्सवाला देखील ३०० वर्षांची परंपरा आहे मुख्य होळी हुताशनी पौर्णिमेच्या १५ दिवस आधी पासून मुरुड कोळयावाडयातील बाल गोपाळ युवक समुद्र किनार्यावर मॅडीचे झाड आणून नाचवितात आणि रात्री होळी प्रज्वलीत करतात १५ दिवस दररोज होळी ठिकाणी हा आनंद द्विगुणित होत हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुध्द पौर्णिमेला मुख्य होळीच्या मैदानावर सुपारीचे उंच झाड पिवळ्या साडीने सजवून बतासे , नारळ बांधून उभे केले जाते त्याआधी सायंकाळी मुरुड शहरातील मुख्य बाजारपेठेतून होळी . . . होळी करीत हेच सुपारीच झाड युवक नाचवित होळी मैदानात घेऊन येतात . घराघरांतून पुरण पोळचा नैवेद्य आणला जातो . मुंबईत असणारे कोळी बांधव ( मच्छीमार ) ससून डॉक येथून आपल्या होड्या झुली , पताका आदिंनी सजवून मुरुडच्या बंदरात चार दिवस आधीच वाजत - गाजत येतात . आर्थिक टेंशन कितीही असले तरी या सणाचे महत्व व पावित्र्य हे सर्व जण अत्यंत समर्पित भावनेने करताना पाहून आनंद वाटतो . कोळीवाडयात होळी पौर्णिमेचा मुख्य दिवस धार्मिक दृष्टीकोनातून महत्वाचा असतो . त्या रात्री उद्योग , शुभ - लाभ अमृत असा मुहूत पाहून गाव पाटील , पंच मंडळींच्या उपस्थितीत होळी पेटविली जाते . अनेकजण होळीत श्रीफळ अर्पण करुन प्रसाद म्हणून घरी नेतात . ढोल ताशे नगाड्यांच्या वाद्यवृंदावर सर्वजण उत्सवात भेदभाव न करता सहभागी होतात हीच या उत्सवाची खासियत असून कधी - कधी परदेशी पर्यटक देखील या उत्सवात सहभागी होताना दिसतात . धुलिवंदन दिनी सर्व कोळी बांधव - महिला भगिनी होळी मैदानावर जमतात . वर्षभरात मृत्यू झालेल्या कोळी बांधवांच्या सर्व सदस्यांना सन्मानाने मैदानावर आणून कुंकुमतिलक व कानाला “ शेवण्याचा सोगा " लावण्यात येतो . संपूर्ण कोळीवाडयात सन्मानाचे बेहोश वातावरण काही बांधव नौका घेऊन संपुर्ण कोळीवाडयात सन्मानाचे बेहोश वातावरण असते . काही बांधव नौका घेऊन समुद्रात फेरफटका मारुन येतात . रुमाल लाऊन केलेली पारंपारिक वेषभुषा वैशिष्ट्य पुर्ण असते . रंगपंचमीच्या दिवशी पाच सुवासिनींच्या हस्ते पाणी शिंपडून मुख्य होळी विझवली जाते धुळवड दिनी कोळी बांधवांचा उत्साह अवर्णनीयच असतो . सर्व दुःख समस्या बाजुला सारुन कोळी बांधव होलिकोत्सवाशी एकरुप होतात . तेव्हा एक संदेश व्यक्त होतो . आपले जीवन विविध रंगानी नटलेले असून ते आत्मविश्वास हित नसावे . परस्पर सौहादीने खुलावे असा हा होलिकोत्सवावीत संदेश असतो .

Post a Comment