तू माझ्याशी लग्न कर नाहीतर बदनामी करीन मुलाकडून मुलीला धमकी ; मुलाला मंडणगड येथून अटक...

तू माझ्याशी लग्न कर नाहीतर बदनामी करीन
मुलाकडून मुलीला धमकी ;  मुलाला मंडणगड येथून अटक...

म्हसळा(निकेश कोकचा)
      म्हसळा शहरातील एका तरुणीकडे लग्नाची मागणी घातल्यानंतर ही मागणी मुलीच्या घरच्यांनी  फेटाळून लावल्याने भडकलेल्या तरुणाने थेट मुलीचा फोटो इन्टरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
      या प्रकरणी आरोपीला मोठ्या शितापीने अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तरपणे वृत्त असे की, म्हसळा गौलवाडी येथे राहणाऱ्या एका तरुणीला नरेश चंद्रकांत तपकिरे रा.पालघर, तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या तरुणाने लग्नाची मागणी घातली होती. या लग्नाच्या मागणीला मुलीसाहित तिच्या घरच्यांनी नकार दिला होता.याचा या तरुणाने मनामध्ये राग धरून तुझ्याशी बोलायचे आहे असे मुलीला व तिच्या घरच्यांना मेसेज करण्यास सुरवात केली.या मेसेज ला मुलीच्या बाजूने कोणताही प्रतिउत्तर न आल्याने हा तरुण भडकला आणि थेट मुलीला फोन करून तूजर दुसर्यासोबत लग्न केलास तर तुझा फोटो इंटरनेटवर टाकून तुझी बदनामी करीन अशी धमकी दिली.


     
तसेच मुलीच्या बहिणीच्या मोबाईल वर कॉल करून मी तुझ्या बहिणीला सर्वांच्या समोरून पळून नेहीन अशीही धमकी या तरुणाने दिली.याच प्रमाणे मुलीचे आई बाबा यांच्या मोबाईलवर सतत कॉल करून धमकी दिल्याबद्दल म्हसळा पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली असून,नरेश चंद्रकांत तपकीर याच्या विरूद्ध म्हसळा गुन्हा रजिस्टर १३/२०१८मधे भादवी कलम ३५४-ड(१)(एक)(दोन),१९०,५०७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदर प्रकरणात म्हसळा येथील सहह्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस नाईक सुर्यकांत जाधव,आनंद राठोड,पोलीस हवालदार सुनील खंदारे,व चालक ए.एस.आय.मडवी यांनी मोठ्या शितापीने आरोपीला मंडणगड तालूक्यातील पालघर गावामधून अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा