म्हसळाचे लखमेश्वर (महेश्वर),देवघरातील अमृतेश्वर आणि घुमचे घुमेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रौत्सवाचे आयोजन ...


म्हसळाचे लखमेश्वर (महेश्वर),देवघरातील अमृतेश्वर आणि घुमचे घुमेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रौत्सवाचे आयोजन                                      

म्हसळा-निकेश कोकचा 

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या म्हसळा तालुका शहराचे गॅजेट मधील नोंदणीकृत असलेले नाव महेश्वर असे नमुद असुन येथे इतिहास काळीन शंकराचे भव्यदिव्य मंदिर असल्याची नोंद करण्यात आली आहे.मुसपल्ली राजाचे कार्य काळात केलेल्या हल्ल्यात हे मंदिर उध्वस्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे.आता येथे नव्याने भव्यदिव्य लखमेश्वर मंदिर उभारण्यात आले आहे.बहुतांश शिव मंदिर ही बारमाही वाहत असलेल्या नदीकाठच्या तीरावर वसलेले आहेत.त्रिवेणीसंगम असलेल्या म्हसळा तालुक्यातील सर्वच शिव मंदिर दक्षिणेकडुन उत्तरेकडे वाहत असलेल्या नदीकाठी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या व भाविकांच्या नवसाला पावतात अशी ख्याती आहे.म्हसळा तालुका शहरातील लखमेश्वर,मौजे देवघर येथिल स्वयंभु श्री अमृतेश्वर आणि घुम येथील घुमेश्वर मंदिरामध्ये साम्यता आहे त्याच बरोबर दक्षिणकाशी हरिहरेश्वर हे मुळ तीर्थक्षेत्र आहे.नाव साधर्म्य असलेल्या या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाल्याची नोंद आहे या मंदिरात मंगळवार दिनांक 13-2-2018 रोजी महाशिवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.घुमेश्वर येथे सकाळी 6 ते 8 अभिषेक,सकाळी 8 ते 9 महाआरती,सकाळी 9 ते 11 ग्रांमस्थांची दिंडी,पुजा पाठ,भजन,किर्तन,सायंकाळी मनोजणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.देवघरात भाविकांच्या मनोरंजनार्थ सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान भागवत धर्मप्रचारक सत्संग मंडळ भरडखोल ता.श्रीवर्धन येथील सदगुरु अमृतनाथ स्वामी यांचे सुप्रसिद्ध किर्तनकार स.भ.प.परशुराम तांडेल यांचे किर्तन होणार आहे.म्हसळा शहरात दिनांक 13 रोजी राजस्थान हिंदु समाज व हिंदु ग्रामस्थ मंडळी चे वतीने सकाळी10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत फलाहार, रात्री 9वाजता भजन, दिनांक14 फेब्रुवारी रोजी दुपारी1ते4वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिवभक्तांनी या उत्सवाला आवर्जुन उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ घुमेश्वर, देवघर व देवघर कोंड आणि म्हसळा हिंदु ग्रामस्थांनी केले आहे.याच बरोबर तालुक्यातील तोंडसुरे, वारळ,काळसुरी आदी शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा