१८ व्या शतकातील केलटे येथील प्राचीन शिवमंदिर...


म्हसळा : महेश पवार
म्हसळा तालुक्यातील केलटे येथील शिवमंदिर हे अठराव्या शतकापूर्वीपासून निर्माण झाले तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव भरला जातो . हे ठिकाण म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वनराईमध्ये व १२ महिने थंडगार गोड पाण्याचे झरे , नदीच्या पात्राला असणारा खळखळ वाहणारा पाण्याचा आवाज , त्याच पाण्याच्या आवाजावर नाचणारे मोर , पक्षी मंत्रमुग्ध नाचत असतात . ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने त्या ठिकाणी मंदिराची उभारणी केली असून पर्यटन विभाग मात्र या तीर्थक्षेत्राकडे दुर्लक्षच करीत आहे गेल्या १८ शतकांपासून केलटे गावातील ग्रामस्थ या मंदिराची देखभाल करतात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो . गावातील वतनदार पाटील हे मंदिरातील शंकराच्या स्थानांची यथायोग्य पुजा  करून येणाच्या सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाते . त्यापूर्वी गावामधून टाळ मृढंग , चिपळ्या घेऊन तुकारामांची भव्य दिंडी काढत ती दिंडी शंकराच्या मंदिरापर्यंत घेऊन जात असतात . त्या दिंडीमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध सहभाग घेतात . येणार्या लहान भाविक यांच्या सर्वासाठी विविध खाऊची दुकाने , थंडगार पेय , अन्य प्रकारची स्टॉल उपलब्ध असतात परंतु या सर्व गोष्टीकडे या पर्यटन विभागाची पाहणी करण्याची मानसिकता दिसत नाही . या मंदिरांची इतिहासात नोंद असल्याची माहिती आहे हे स्थळ जर पर्यटन विभागाने विकसित केले तर येथे येणाच्या भाविकांची संख्याही वाढेल . त्याचप्रमाणे येथील स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल . याच मार्गावर दक्षिण काशी , हरिहरेवर तीर्थक्षेत्र आहे . तेथून ३ किमी . अंतर असल्याने येणाच्या पर्यटकांना सोईचे होणार आहे त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची मागणी ग्रामस्थांकडून पुढे येत आहे...


माझ्या जीवनशैलित गेली ९२ वर्षांत हे शंकर मंदिर प्रत्येकाला वरदान देणारे ठरले आहेमाझा जन्म हा १९२८ साली झाला त्याच्या पूर्वी हा मंदिर अठराव्या शतकामध्ये देखील होता. तेव्हापासून या मंदिरात अनेक गावातील भाविक येत होते त्यावेळी अनेक साधु महाराज त्या ठिकाणी दर्शनाला येत होते आज माझे वय ९२ च्या वरती आहे. तरीदेखील आजही त्या मंदिराचे पावित्र्य अबाधित आहेपरंतु, सरकाराने या मंदिराकडे लक्ष दिल्यास ते चांगले प्रसिद्ध होईल.
- रामजी सुडकोजी कोबनाक

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा