श्रीवर्धन तालुक्यातील गाणी गावात शिवसेनेला खिंडार : शिवसैनिकांचा राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश...

श्रीवर्धन तालुक्यातील गाणी गावात शिवसेनेला खिंडार शिवसैनिकांचा राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश

श्रीवर्धन (विजय गिरी) राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आम. सुनिल तटकरे यांनी केलेल्या विकासकांमाची भुरळ जनतेला व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना  पडु लागली आहे.आम. सुनिल तटकरे यांचा विकास कामांचा धडाका पाहुन त्यांच्या कार्यप्रणालीवर खुष होवुन विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षात पक्षाची सत्ता नसतानाही जाहीर प्रवेश करीत आहेत.गेले अनेक वर्षे शिवसेनेत प्रामाणीक पणे काम केलेले माजी जि.प.सदस्य अविनाश कोळंबेकर यांनी पक्षातुन काढ्न टाकल्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे श्रीवर्धन दौऱ्यावर आले असता आम.ुसुनिल तटकरे यांच्यावर व पक्षावर विश्वास दाखवत जाहीर कार्यक्रमात प्रवेश केला होता.कोळंबेकर यांच्या मागोमाग विविध पक्षात घुसमट होत असलेले कार्यकर्ते राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करायला लागले आहेत.सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा इतिहास देशात असताना देखील केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत भागीदार असताना देखील आजरोजी सत्ता नसलेल्या राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षात शिवसैनिक प्रवेश करीत आहेत.स्वपक्षाकडुन भ्रमनिरास झााल्याने प्रवेश करण्याचे प्रमाण वाढत आहे.श्रीवर्धन तालुक्यातील एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गाणी या गावातील मुख्य कार्यकर्त्यांनी  नुकताच मुंबई येथे आम. सुनिल तटकरे यांच्या उपस्थीतीत राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.या वेळी या मुख्य कार्यकर्त्यांनी संपुर्ण गावच राष्ट्र्वादी काॅग्र्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ग्रामस्थांच्या प्रवेशाचा कार्यक्रम गाणी येथे मोठ्या दिमाखात आयोजीत केला जाईल असे जाहीर केले.राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जावु देणार नाही.तसेच विकास कामांत श्रीवर्धन तालुका कधीही मागे पडणार नाही,विकास कामांचा वेग याही पेक्षा जास्त राहील असे सांगुन प्रवेश कर्त्यांना पक्षात योग्य मान सन्मान नेहमीच राहील याची ग्वाही दिली. या वेळी पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी युवानेते अनिकेतभाई तटकरे,तालुकाअध्यक्ष दर्शन विचारे,अविनाश कोळंबेकर, राधेशाम जावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
.या वेळी प्रवेश कर्ते कार्यकर्त्यांनी गाणी गावातील  सर्व ग्रामस्थ पुर्ण शक्तीनिशी राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षाच्या पाठिशी  खंबीरपणे  उभे राहणार असल्याचे जाहीर करुन संपुर्ण पंचक्रोषी राष्ट्र्वादीमय करु असे सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा