म्हसळाःरा जि प शाळा पाभरे मराठी येथे शासकिय शिवजयंती साजरी करण्यात आली.


म्हसळाःरा जि प शाळा पाभरे मराठी येथे शासकिय शिवजयंती साजरी करण्यात आली.
    शिवजयंतीनिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक मा.रायप्पा माशाळे सर यांचे 'राजा शिवछत्रपती व आजची पिढी' या विषयावर उद् बोधक व्याख्यान आयोजित करण्यात आले .आजच्या तरूण पिढीने व्यसनापासून दूर राहून सुंदर जीवनाचा आनंद घ्यावा व छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण अंगीकारावा .असे सखोल मार्गदर्शन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
      प्रशालेच्या सांस्क्रतिक विभागातर्फे शिवचरित्रावर आधारित पोवाडे ,विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला .
  या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हरिश्चंद्र बसवत, सदस्या नुतन गोविलकर,सवादकर,भास्कर वेटकोळी,जगदिश मेंदाडकर,शिक्षण प्रेमी मा.अनिल बसवत ,सर्व ग्रामस्थ, पालकवर्ग ,सर्व  विद्यार्थी उपस्थित होते.
        कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न प्रभारी मुख्याध्यापक श्री काशिनाथ खोत सर ,श्रीम तन्वी चव्हाण मँडम,श्रीम चोबे मँडम श्री अमित काटकर तेजुसिंग राठोड ,अतिथी शिक्षक विश्वेश पाटील,संध्या मँडम, श्रध्दा मँडम यानी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा