म्हसळा तालुक्यातील सर्व धर्मियांनी बहुजन क्रांती मोर्चाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९, फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता पाच गाव आगरी समाज हॉल येथे जयंती संपन्न झाली. प्रथम सकाळी पाभरे फाटा ते म्हसळा बाजारपेठ येथून रॅली काढण्यात आली. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आले . . उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राहुल नाईक यांनी केले. उपस्थित मान्यवरानी मनोगत व्यक्त केले श्री मा. श्री अनंत येलवे , अहमद आली पेणकर, निळेश मेंदाडकर , हिरामण चव्हाण , मुक्तार नजिर निर्मला म्हात्रे आदी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले,. तसेच प्रमुख अध्यक्षता मा. श्री. हभप महेश पोंगडे महाराज यांचे सखोलपणे मार्गदर्शन झाले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत कार्याचे वर्णन केले., शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी हा सुखी होता आणि आज सगळीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे या परिस्थितीवर महाराजांनी प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित सुंदर व्याख्यान झाले. उपस्थित बांधवांनी पोंगडे महाराज यांचे मार्गदर्शन अवलोकन केले. बहुजन क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले. या भारतात ३१ राज्य आणि ५०० जिल्हा व तालुका मधुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे साजरी करण्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप शिंदे यांनी केले.
म्हसळ्यात छ. शिवाजी महाराज यांची सर्व धर्मियांनी जयंती केली साजरी.
Admin Team
0

Post a Comment