म्हाळ्याचा अथर्व कदम बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम...

म्हसळा प्रतिनिधी,
रोटरी क्लब ऑफ खोपोली गेल्या दहा वर्षापासून इंटरअक्ट शाळांमधील मुलां - मुलींसाठी स्पर्धा आयोजित करून विद्याभ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रोटरी क्लब येथे स्पर्धा आयोजित करते . याहीवर्षी क्लब तर्फ बुद्धिबळ व इतर विविध स्पर्धांचे आयोजन कण्यात आले होते . या स्पर्धेचे उद्घाटन उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या खुल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २०२ खेळाडूंनी भाग घेतला . म्हसळ्यातील अथवी दिलीप कदम याने यापुर्विही अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्षे त गोल्डमेडल , प्रथम पारितोषिके मिळवून आपल्या कॉलेजसह स्वतःचे नाव उज्ज्वल केले आहे खोपोली येथे संपन्न झालेल्या विविध वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत १५ वर्षे वयोगटातील गटात अथर्व दिलीप कदम याने प्रथम पटकाविला . त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वांनी कौतुक केले आहे विजयी खेळाडूंना रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप , संजय पाटील , अनिल खालापुरकर , मिलिंद बोधनकर , रायगड बुद्धिबळ असोसएशनचे अध्यक्ष विलास म्हात्रे , आदि  मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा