शिवशाही बसचे म्हसळा तालुक्यात आगमन; ३६५ रुपयांत मुंबई सेंट्रल ते दापोली प्रवास :प्रवास्यांन मध्ये आनंदाचे वातावरण
म्हसळा - निकेश कोकचा
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या शिवशाही बसचे म्हसळा तालुक्यात आगमन झाले आहे. शिवशाही बसच्या आगमनाने एसटी बसच्या प्रवास्यानमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून परिवहन मंडळाच्या दर्जेदार सेवेचा लाभ घेता आले.संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी बस प्रवास्यानच्या सुखकर व आरामदायी प्रवासासाठी शिवशाही बस सेवा सुरु केली.हि शिवशाही बस मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या चाकरमन्यांना कोकणामध्ये येण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि बोरीवली ते दापोली मार्गावर देखील सुरु करण्यात आली आहे.या मार्गावर म्हसळा तालुक्यातील आंबेत स्थानकामध्ये हि बस दाखल झाल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.सदर शिवशाही बसमधून कोकणातील चाकरमान्यांना प्रवास करायचा असल्यास त्याचे पुढील प्रमाणे मार्ग व वेळ असणार आहे.
मुंबई सेंट्रल/बोरीवली मार्गे शिव, कुर्ला नेहरू नगर,पनवेल,माणगाव,गोरेगाव,आंबेत,म्हाप्रळ,मंडणगड,दापोली असून गाडी सुटण्याची वेळ मुंबई सेंट्रल ते दापोली सकाळी ५:३० आणि रात्री १० वाजता तर दापोली ते मुंबई सेंट्रल सकाळी १० आणि रात्री ११ वाजता ठेवण्यात आली आहे.बोरीवली मधून दापोली साठी सकाळी ७ आणि रात्री ९ वाजता असून दापोली ते बोरीवली साठी सकाळी ६ आणि रात्री १० वाजता हि बस सोडण्यात येणार आहे.या बसचे मुंबई सेंट्रल ते दापोली भाडे ३६५ तर बोरीवली ते दापोली भाडे ३९४ रुपये ठेवण्यात आले आहे.

Post a Comment