तलाठयावर हल्ला करणारे मोकाटच : श्रीवर्धन तालुका तलाठी संघाकडून निषेध ; तहसिलदारांना निवेदन
श्रीवर्धन, प्रतिनिधी
गौणखनिज अनधिकृतपणे उत्खनन करुन त्याची वाहतूक करणाच्यांवर कारवाई केल्याप्रकरणी निंगळवाडे ( जि . जळगाव ) येथील तलाठी योगेश पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाच्या हल्लेखोरांना अटक करण्यात यावी , याकरिता श्रीवर्धन तालुका तलाठी सघाच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले गौणखनिज अनधिकृतपणे उत्खनन करुन त्याच वाहतूक करणाच्यांवर कारवाई केली याचा राग ठेऊन येथील माफियांनी व त्यांच्या साथिदारांनी निंगळवाडे येथील तलाठी योगेश पाटील यांना बेदम मारहाण करुन शिवीगाळी केली . या हल्लेखोरांवर कारवाई व्हावी तसेच अंमळनेर पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचेवर निलंबनाची कारवाई व्हावी , याकरिता महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व रायगड तलाठी संघ यांच्या आदेशावरुन श्रीवर्धन तलाठी संघाच्यावतीने आंदोलन सुरु करण्यात आले असून त्यासंबंधीचे निवेदन तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले . त्यावेळी दत्ता कौं , नामदेव काकडे , अर्जुन भगत टी . आर . उमाळे , संतोष विरकुड , एच . कळंबे , सुरेखा राऊत , बाबासो शेट्ये , . ए . देवकांत आदी तलाठी उपस्थित होते शनिवार व रविवार असे दोन दिवस काळ्या फिती लावून काम करण्यात आले तर आज सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत तहसिल कार्यालयासमोर धरणे करुन निषेध नोंदविण्यात येणार आहे . ९ फेब्रुवारी रोजी लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात मंडळ अधिकारी , तलाठी व तलाठी संवर्गातील सर्व अव्वल कारकून सहभागी होणार आहेत .

Post a Comment