श्रीवर्धन : वाकळघर नदीवरील बंधार्याचे भूमीपूजन

श्रीवर्धन : वाकळघर नदीवरील बंधार्याचे भूमीपूजन 

बोर्ली पंचतन
पद्मभूषण स्व . मोहन धारिया यांच्या १३ व्या जयंतीचे औचित्य साधून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत वनराई संस्था पुणे यांच्या विद्यमाने श्रीवर्धन तालुक्यातील वाकळघर येथे बंधाच्याचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले . यावेळी वाकळघर येथे नदीवर बांधण्यात येणाच्या बंधाच्याचे भूमिपूजन पाणलोट समिती अध्यक्ष वसंत राऊत यांनी श्रीफळ वाढवून प्रकल्पाचा श्रीगणेशा केला . वनराई संस्थेचे संस्थापक पद्मभूषण मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा वाकळघर येथे जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली . वाकळघर ग्रामपंचायत येथे सरपंच संजीवनी भोगल यांनी पद्मभूषण मोहन धारिया यांच्या प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमाप्रसंगी वसंत राऊत यांनी मोहन धारिया यांच्या कार्याची माहिती दिली . गावस्तरावर राबविल्या जाणाच्या विविध योजनांची माहिती श्रीधर शेलार यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिला मंडळ यांना दिली . बंधारा भूमीपूजन कार्यक्रमाला जयवंत चव्हाण , ग्रामविकास मंडळ मुंबई , मनोज राऊत , सुनील चव्हाण , प्रभाकर ओमले , संजय कदम आदि ग्रामस्थ उपस्थित होते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा