म्हसळा ग्रामीण रुग्णालय समस्याग्रस्त : कर्मचारी , परिचारीका यांचा सहा महिन्यांचा पगार रखडला...

म्हसळा ग्रामीण रुग्णालय समस्याग्रस्त : कर्मचारी , परिचारीका यांचा सहा महिन्यांचा पगार रखडला...

म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले असून अपुच्या सोयीसुविधांमुळे रोजच रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . त्यात अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने येणाच्या रुग्णांना सेवा देताना उपलब्ध कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते . कामाचा ताण असताना गेल्या सहा महिन्यांपसून कर्मचारी , परिचारीका यांचा पगार रखडल्याने कुटुंब चालवायचे कसे ? या विवंचनेत ते सापडले आहेत . म्हसळा येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे इम् रतीचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री आसुनील तटकरे यांनी २५ मे २०१४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन भांगे , जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ . अजित गवळी यांच्या उपस्थितीत केले होते येत्या चार दिवसांत आवश्यक सर्व कर्मचारी वर्गासह बाह्यरुग्ण , आंतर रुग्ण , ससज्ज प्रयोगशाळा , क्ष किरण विभाग अशा सर्व सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते . त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी शासनाला जाग आली व १ वैद्यकीय अधिकारी , ६ परिचारीका , १ ऑफीस सुपरीटेंड , १ कक्षसेवक १ स्त्री परिचारीका असा तुटपुंजा स्टाफ देण्यात आला ; परंतु गेले महिने या कर्मचार्यांना आरोग्य विभागाने पगारच ६ दिलेला नाही . या रुग्णालयातून मिळणाच्या आरोग्य सेवा तुटपुंज्या आहेत . गेले ६ महिने राज्य शासनाच्या आराग्य विभागचे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य काम करीत आहेत ग्रामीण विभागाच्या अधिपत्याखाली . रुग्णालयाला इमारत राज्य शासनाची व व्यवस्थापना जिल्हा परिषदेचे अशी परिस्थिती असल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची तारेवरची कसरत होत आहे . आजमितीस सदर इमारतीचे ८० हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे . कधीही विद्युत पुरवठा खंडीत होऊ शकतो अशी नोटीस दिली असल्याचे सांगण्यात आले . म्हसळ्यातील आरोग्य सेवा अत्यंत समार दर्जाची असल्याच्या तक्रारी स्थानिक शिवसैनिकांकडून होत आरोग्य असल्याने विभागाच्या उप - संचालक डॉ . रत्ना रावखंडे यांनीही भेट दिली होती ; परंतु त्यानंतरही कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही . 

ग्रामीण रुग्णालय इमारतीचे गूढ...
ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचा ताबा आरोग्य विभागाने घेतलाच नसल्याचे आजही सांगण्यात येते . अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम , ग्रामिण रुग्णालयाचे आवश्यकतेनुसार बांधकाम , ईलेक्ट्रीक फिटींग्ज , स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नसणे , वैद्यकीय अधिकार्यांची निवासस्थाने अशा अनेक त्रुटी आहेत . आरोग्य विभागाकडे इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचे समजते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा