मुंबईतून श्रीवर्धन निघालेल्या नवरदेवाच्या गाडीला म्हसळ्यात अपघात:नवरदेवासहित ४ जण बचावले
म्हसळा- निकेश कोकचा
मुंबईतून श्रीवर्धन तालुक्यातील मूळगावी लग्नासाठी जात असलेल्या नवरदेवाच्या गाडीला म्हसळा पोलीस चेक पोस्ट येथे अपघात झाल्याची घटना ५ फेबृवारी रोजी घडली आहे.या अपघातात गाडीमध्ये असणाऱ्या नवरदेवासहित सर्वजण थोडक्यासाठी बचावले आहेत.याबाबत सविस्तरपणे वृत्त असे की,लग्न ठरल्यानंतर काही दिवसांआधी नवरदेव मंगेश घोलप याने लग्नासाठी ह्युंदाई कंपनीची एसेंत गाडी विकत घेतली.विकत घेतलेल्या गाडीमधून नवरदेव आपल्या कुटुंबासहित मुंबई येथून श्रीवर्धन तालुक्यातील मौजे धारवली येथे साखरपुड्यासाठी जात असताना ५ फेबृवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास म्हसळा चेक पोस्ट जवळ एका दुचाकीस्वाराने हुलकावणी दिल्याने दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी नवरदेवाच्या गाडी चालकाने आपली गाडी विरूद्ध दिशेला नेहली.या घटनेत नवरदेवाची गाडी रस्त्यालगतच्या एका झाडावर जाऊन आदळली असल्याने गाडीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.पण गाडीत असणाऱ्या नवरदेवासहित सार्वजन थोडक्यासाठी बचावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment