श्रीवर्धन - बोलॅपंचतन रस्त्याला झुडपांचे साम्राज्य ; वाहतूक धोक्याची...


दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्यातील बोलीपंचतन - श्रीवर्धन मुख्य रस्ता हा सर्वाधिक रहदारीचा भार असलेला मार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते . मात्र , या रस्त्याला झाडे वाढल्याने झुडपांचे पसरलेल्या साम्राज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे एकीकडे श्रीवर्धन तालुक्यासाठी शासनाकडून पर्यटन स्थळांच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना पर्यटन स्थळांकडे येणार्या रस्त्यांची देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग का लक्ष देत नाही . असा प्रश्न विचारला जात आहे . श्रीवर्धन - बोर्ली मार्ग हा १७ किमी अंतराचा घाट रस्ता अत्यंत अरुंद आणि वळणावळणाचा आहे रस्ता डोंगरभागातून गेला आहे . आजुबाजुला डोंगरदर्या असल्याने पावसाळ्यापासुन वाढलेली झाडे , झुडपे अद्यापही हटविण्यात आली नाहीत . बांधकाम विभागाची डोळेझाक होत असल्याने हि बाब प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे . याच रस्त्याने श्रीवर्धन आगारातून बोर्ली मुंबई , पुणे आदि लांबपल्याची एसटी वाहतूक , बॉक्साईड वाहतूक व प्रामुख्याने या रस्त्याचा वापर रत्नागिरी जिल्हा बानकोट खाडीतील जलप्रवास ( फेरी बोट ) करणार्या पर्यटक व नागरिकांना श्रीवर्धन , दिवेआगर , मुरुड , अलिबाग या ठिकाणी जाण्यासाठी होतो . अत्यंत महत्वाचा असा हा मार्ग असल्यामुळे या रस्त्याला वाहनांची ये - जा मोठ्या प्रमाणात होत आहे बोर्ली विभागातील अनेक नागरिकांना शासकीय कामानिमित्त तर आजारी व्यक्तींना हॉस्पिटलसाठी श्रीवर्धनला जावे लागते . रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे दुचाकी , रिक्षा अशा वाहनाना प्रवास करताना समोरुन येणारे वाहन या झुडपांमुळे न दिसल्याने वळणावर समोरा - समोर वाहनांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . या घटना टाळण्यासाठी रस्त्यावर आलेली काटेरी झुडूपे तोडुन साईडपट्टी खड़े बुजविण्यात यावे , येथील अरुंद रस्ता , साईडपी पूर्णपणे खचलेल्या , धोकादायक वळन , तीव्र उतार व रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपांची वाढ यामुळे प्रवास करताना प्रचंड त्रास होतो . येथील प्रवास दिवंसेदिवस भीतिदायक ठरत आहे . रस्त्यावर आलेली काटेरी झुडूपे तोडुन रस्ते मोकळे करावेत अशी मागणी वेळोवेळी होत आहे बोलं ते श्रीवर्धन जाण्यासाठी सरळमार्गे म्हणून ओळखल्या जाणाच्या दांडगुरी पुलानजिक नागलोली फाटा , वावे , म्हाब्धाघाट आदि अनेक ठिकाणी झुडपांची मोठ्याने वाढ झाली आहे . रस्त्यापर्यंत असलेल्या या झुडपांमुळे तीर्व उतारातून आलेली वाहने भरधाव वेगाने येतात आणि अचानक असुंद रस्ता व काटेरी झुडपे समोर आल्याने वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडबडतात . अशावेळी अपघातालाहि सामोरे जावे लागते . काटेरी झुडपांमुळे दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत आहे दोन चार दिवसात किमान सहा ते सात जण वाहन चालक काटेरी झुडपांना घासून जखमी होत असल्याची परिस्थिती आहे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालावी लागत आहे . त्यामुळे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडू नये . या घटना टाळण्यासाठी रस्त्यावर आलेली काटेरी झुडूपे तोडुन साईडपट्टीवरील खड़े बुजविण्यात यावे , अशी मागणी परिसरातील वाहनचालकांकडून होत आहे वास्तविक सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील झाडे हटविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे . अन्यथा अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे अशा अपघातजन्य स्थितीत वाहने नेमकी कशी चालवायची असा सवाल वाहनचालकांना पडला आहे आता सर्वांचे लक्ष प्रसासनाच्या भुमिकेकडे लागले आहे.

बोर्ली मार्गाचा सद्यस्थितीचा प्रवास अरुंद रस्त्यावरून सुरु आहे येथे असलेल्या काटेरी झुडूपांमुळे रस्त्यावरील वाहणांचा प्रवास धोकादायक ठरत आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत आहे यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे . यामार्गाकडे लक्ष देवून रस्त्यातील अडथळे दूर करणे आवश्यक आहे . यामार्गावरील प्रवास सुरक्षित व्हावा एवढीच इच्छा आहे
-विनोद हेडकर , बोर्ली पंचतन 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा