२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन श्रीवर्धन एस . आगारात श्रीवर्धन स्थानकात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . त्यावेळी आपले विचार मांडताना प्रमुख वक्ते प्रा . अनिल खरात , आनंद जोशी दिसत आहेत . बाजूला प्रसाद मोरे , श्री . पवार आगार व्यवस्थापक सौ . रेश्मा गाडेकर , किरण उपासनी आदि मान्यवर उपस्थित होते .
२७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ व थोर कवी , नाटककार कवी कुसुमाग्रज तथा वि . वा . शिरवाडकर यांचा जन्मदिन असून तो सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो . श्रीवर्धन एस . टी . आगारातफेही हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . या समारंभास प्रमुख वक्ते व र ना . राऊत कनिष्ठ म हाविद्यालयाचे प्रा . अनिल खरात , आगार व्यवस्थापक सौ . रेश्मा गाडेकर , पत्रकार किरण उपासनी , अकाऊंटंट श्री पवार व अन्य मान्यवर तसेच एस . टी चेअनेक कर्मचारी , प्रवासी इ . मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा . अनिल खरात सर यांनी मराठी भाषेचे पुरातन कालापासूनचे महत्व सांगून अनेक उदाहरणे दिली जोशी यांनी आनंद आपल्या भाषणात मराठीमधील एका अक्षराने पडणारा फरक उदाहरणासह सांगून आजपासून एक आठवडाभर वाचन सप्ताह पाळावयाचा असल्याचे सांगितले . याशिवाय कार्यक्रमात एस . टी . चे एम टी . आंधळे , राहुल गायकवाड , संतोष सापते , आगार व्यवस्थापक सौ . रेश्मा गाडेकर यांनी ही मराठी भाषेचे महत्त्व विषद केले . सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री . प्रसाद मोरे यांनी नेटकेपणाने केले .

Post a Comment