म्हसळा तालुक्यातील मेंडदी गावातील लोकशाहीर विजयबुवा पायकोळी व सुप्रसिद्ध गीतकार दुर्वास पायकोळी यांची कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी कायपण या मालिकेसाठी मुलाखत घेण्यात आली आहे.सदर मुलाखतीचे प्रक्षेपण दि 1 मार्च ते 2 मार्च रोजी रात्री 9.30 मिनिटांनी दाखवण्यात येणार आहे.कलर्स मराठी वाहिणीद्वारे तुमच्यासाठी कायपण या मालिकेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध लोककला व लोकशाहीर यांना एकत्र करून होळी उत्सवाच्या निमित्ताने रंग महाराष्ट्राचा या संकल्पनेवर विजय पायकोळी व दुर्वास पायकोळी यांची मुलाखत झाली.सतात्याने अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात शक्ती तुरा या लोककलेसोबत कोळीगीत,भक्तिगीते, लोकगीतं, भावगीत आशा सर्वच प्रकारात पायकोळी बंधूनी कुटुंबातील सर्व सभासदांच्या साथीने आपल्या कलेची छाप सोडली आहे.या उपेक्षित कलावंतांना कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी कायपण रंग महाराष्ट्राचा या मालिकेद्वारे व्यासपीठ मिळाल्याने तालुक्यातील विविध पक्ष ,संघटना तसेच जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दुर्वास पायकोळी यांची कलर्स मराठीवर मुलाखत...
Admin Team
0
Post a Comment