दिघी पोर्ट कंपनीच्या गाड्यांना थोपवणार कोण ? अपघातांचे प्रमाण वाढले , प्रशासन दिघी पोर्ट पुढे नमले...




म्हसळा : महेश पवार
म्हसळा माणगाव रस्ता म्हणजे दिघी पोर्ट कंपनीला बहाल केलेला रस्ता असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण माणगाव ते दिघी रस्त्यावर भरधाव वेगाने धावणारी वाहणे राजेखुशी धावत असताना त्यांच्या वरती अंकुश कोणाचे नसल्याने आज हि परिस्थिती पाहण्यास मिळत आहे . या विषयी सविस्तर वृत्त असे की दरोज म्हसळा माणगाव रस्त्यावर सायंकाळी ते पहाटे पासून अवजड लोखंडी चाळीस टनाच्या कॉईल घेऊन दिघी पोर्ट कंपनीच्या गाडया सातत्याने धावत असतात परंतु त्यांना शिटया मारायच्या कोणी ? असा मोठा सवाल निर्माण झाल्याचे बोलले जात आहे . जेव्हा त्या गाड्या जात असतात त्यांना समोरुन येणारी लहान वाहने जणू कचरा समजतात . समोरून बाईकस्वाराने लाईट दिली तरी देखील आपला वेग व मोसम न थांबवता येणाच्या बाजूला गाड्यांना झपाट्याने सारून मार्ग मोकळा आपला करणार्या वाहनांना आळा घालणार कोण ? कारण संध्याकाळी ७ ते सकाळी ८ या वेळेत पोलिस यंत्रना आपल्या वेळे नुसार काम करत असतात परंतु त्यांना देखील दिघी पोर्टच्या गाड्या जुमानत नसल्याचे बोलले जात आहे केवळ पोर्ट हा आमच्या मालकीचा व सत्तेचा आहे असे म्हणारे गाडी चालक मालक कंपनी मालक वावरत असल्याने सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे . एकीकडे मुळात रस्ता अरुंद तर जो रस्ता आहे त्याची मर्यादा कमी टनाची असताना अतिक्रमण करत अनाधिकृत रस्त्यावर आपला व्यवसाय करत असणारी दिघी पोर्ट कंपनी प्रशासनाला आपल्या ताटा खालचे मांजर प्रमाणे वागवत असल्याचे मत शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के यांनी व्यक्त केला आहे . या विषयी शिवसेना पक्षाने अनेक वेळा उपोषण , रस्ता रोको , मोर्चे काढले होते परंतू त्यांना देखील दिघी पोर्ट जुमानत नाही . सर्वसामान्यांसाठी असणारा रस्ता दिघी पोर्ट मात्र सहजपणे बेसुमार वापरत असल्याने रस्त्याची दुराअवस्था झाली आहे . त्याचा नाहक परिणाम सर्व सामान्यांना भोगावा लागत आहे त्यामुळे पोर्टच्या वेगवान वाहन थांबवणार कोण हेच उमगत नसल्याने प्रशासन नेमकी करते काय ? असा सवाल सर्वांनाच पडला आहे . या पुढे वेगवान दिघी पोर्टच्या वाहनावर कारवाई होणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत . 


आम्ही माणगाव म्हसळा रस्त्याने प्रवास करत असताना आमच्या समोरून येणारा ट्रेलर ( दिघी पोर्ट कंपनीची कॉईल घेऊन येणारी गाडी ) खुप वेगवान होती आम्ही त्याला समोरून लाईट दिली, हात केले परंतू तो न थांबता आम्हाला जोराने, अगदी जवळून घासून गेला सुदैवाने आम्हाला काहीच झाले नाही. आम्ही त्या गाडीचा शोध घेतला परंतू तिचा सुगावा लागला नाही.  असे बेहोशपणे गाडी चालवणारे निष्पाप लोकांचा बळी घेण्यास मागे पुढे पाहणार नाही . आम्ही पुणे मधुन अनेक वेळा या मार्गानि प्रवास करतो परंतु या गाड्यांचा प्रकार अशाच प्रकारचा असतो . यांना वेळेत आळा घातला नाहीतर आम्हाला प्रवास करणे धोक्याचे ठरणार आहे
- एक पुण्यातील पर्यटक 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा