बोर्ली पंचतन येथे भंडारी समाज सभामंडपाचे उद्घाटन : समाजाचे ऋण कधीही न फेडता येणारे - राजिप सदस्या सायली तोंडलेकर
बोर्ली पंचतन, प्रतिनिधी
माझ्यासारख्या गृहिणीला आपल्या सर्वांच्या आशिर्वादानेच परिसरातील जनतेची समाजसेवा करण्याची संधी मिळाली असून समाजाचे कोणतेही काम केल्याने ते ऋण फेडता येणार नाहीत , असे जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर यांनी तर जनतेची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्य असल्याचे प्रतिपादन माजी सभापती स्वाती पाटील यांनी केले . श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन भंडारी समाज संघटनेचे १० लाख रूपयांच्या निधीतून बांधण्यात आलेले पहिल्या मजल्यावरील महिला समाजगृहाचे उद्घाटन स्वाती पाटील व राजिप सदस्या सायली तोंडलेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या . या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे , शिवसेना उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर , राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सुजित पाटील , उपसरपंच मंदार तोडणकर , भंडारी समाजाध्यक्ष शशिकांत परकर , उपाध्यक्ष अरूण तोंडलेकर , सचिव प्रसाद मुरकर , सहसचिव योगेश तोंडलेकर , खजिनदार नंदु पाटील , महिला अध्यक्षा सिमंतिका तोडणकर सर्व महिला मंडळ पदाधिकारी , खोतीप्रमुख रमाकांत तोंडलेकर , लिलाधर खोत , शरद भाटकर , सौगंध तोडणकर उपस्थित होते .
Post a Comment