साडे तीन वर्षात गीतेंनी आणला ७४ कोटींचा विकासनिधी...
विरोधकांच्या टिकेला कामातून दिले सडेतोड उत्तर
एक काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशा स्वरुपाची टिका रायगडचे खासदार केंद्रियमंत्री , केंद्रियमंत्री अनंत गीते यांच्यावर नेहमी होते . मात्र वास्तव खुपच वेगळे आहे . गेल्या साडे तिन वर्षांत गीते यांनी केंद्राच्या विविध योजनामधून तब्बल ७४ कोटी १९ लाख ४८ हजार ६३९ रुपये इतका निधी रागयड लोकसभा मतदारसंघात उपलब्ध केला असल्याचे शासनाच्या अधिकृत आकडेवारीवरुन लक्षात आले आहे अनंत गीत यांनी हे रायगड , रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत सलग सहावेळा निवडून आले आहेत . केंद्रियमंत्री पद भुषवण रे गीते यांनी गेल्या साडे तिन वर्षांत रायगड मतदारसंघात प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेतून १५ गावातून रस्ता पोहचवत ३१ कोटी ३६ लाख इतका निधी खर्च केला आहे . तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २३ कामे करताना ३० कोटी २६ लाख ५२ हजार इतका निधी खर्च केला आहे . ( या योजनेचे पालकमंत्री अध्यक्ष असतात मात्र सुचवणारा या कामांचे केडीट घेत असतो ) खासदार स्थानिक विकास कार्यक्रमात अंतर्गत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील महाड , रोहा , म्हसळा , श्रीवर्धन , मुरुड , पेण , अलिबाग , तळा , माणगाव या तालुक्यात तब्बल ३४४ विकास कामे केली आहेत . या कामांसाठी १२ कोटी ५६ लाख ९६ हजार ६३६ इतका खर्च त्यांनी केला आहे राज्यातील खासदारांमध्ये निधी खर्च करण्यात गीते हे नेहमीच अग्रेसर असतात मात्र त्यांच्या कामाची जाहिरातबाजी करत नसल्यामुळे ते अनेकवेळा विरोधकांच्या टिकेचे धनी होताना दिसतात रायगडात तर गीते यांच्यावर , एक काम दाखवा हजार रुपये मिळवा असे बक्षिस लावण्यात येते . मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देताना ते दिसत नाहीत . या उलट त्यांनी केलेली विकासकामे लक्षवेधी असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते .
Post a Comment