सार्वजनिक बांधकाम समिती मार्फत म्हसळा शहरात विकासाला अधिक गती देणार-दिलीप कांबळे



सार्वजनिक बांधकाम समिती मार्फत म्हसळा शहरात विकासाला अधिक गती देणार-दिलीप कांबळे

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा नगरीचा पहिला नगराध्यक्ष आणि आता नव्याने बांधकाम समिती सभापती होण्याचा बहुमान आदरणीय आमदार सुनिल तटकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिला आहे.सुरवातीलाच सव्वा वर्षात नगराध्यक्ष म्हणुन सर्वांना विश्वासात घेत आणि आमदार सुनिल तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून लोकपयोगी निर्णय व समाजहिताच्या योजना राबवू शकलो आहे.आताही त्याच जोमाने म्हसळा नगरपंचयतीचा बांधकाम सभापती पदाचा कार्यभार करीत नगरीच्या विकासासाठी गतिमान काम करेन असे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती दिलीप कांबळे यांनी वार्तालाप करताना सांगितले.पदभार स्विकारल्या नंतर म्हसळा नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम समितीची सभा बांधकाम सभापती श्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे,नगरसेवक संजय दिवेकर,नगरसेविका सेजल खताते, नगरसेवक सुभान हलदे,लिपिक अशोक सुतार,संतोष कुडेकर उपस्थित होते. सभेत म्हसळा शहरातील नवीन विकास कामांचे ठराव करण्यात आले आणि मागील रखडलेले कामांचा आराखडा तयार करून विकास काम करण्यात येतील असे सभापती दिलीप कांबळे यांनी माहीती देताना सांगितले.सभेत म्हसळा रोहिदास नगर येथील सुभाष वाळवटकर,श्री मंगेश म्हशीलकर यांच्या घराशेजारी संरक्षण भिंत बांधणे,अंतर्गत रस्ता काँक्रीटी करण करणे,सावर येथील अंगणवाडी इमारत दुरुस्ती करणे,गवळवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटी करणे,नवा नगर येथे रस्ता काँक्रीट करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा