म्हसळा सार्वजनिक वाचनालयातर्फ शनिवारी पालकांसाठी कार्यशाळा ...

मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी म्हसळा सार्वजनिक वाचनालयातर्फ शनिवारी पालकांसाठी कार्यशाळा 

म्हसळा प्रतिनिधी,
शालेय व महाविद्यालयीन मुलांच्या प्रगतीसाठी पालकांचा आत्मविकास अभियानाचे दृष्टीने त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे याकरिता म्हसळा सार्वजनिक वाचनालयात खास पालकांसाठी कार्यशाळेचे शनिवारी ( दि . १७ ) सकाळी १० . ३० वाजता आयोजन करण्यात आले आहे . पालकांच्या कार्यशाळेला मुंबई येथील प्रमुख वक्ते संजीव लाटकर हे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत . मुलांचे मार्क व मेरिट वाढ कसे करून घ्यावे , मुले अभ्यासात नव्हे तर आत्मविश्वास आणि स्वयंप्रेरणेत कमी पडतात त्याला पालकच मदत करू शकतात मुलांच्या शालेय व महाविद्यालयीन प्रगतीत येणारे अडथळे समजुन पालकांना मार्गदर्शन , पालकत्व ही कला आहे पालकांच्या कार्यशाळेच्या माध्यमातून ती उत्तमपणे आत्मसात होते वेळ वाचवून वेळ वाढविणे , वेळ नियोजनाची थेरी , मन स्वास्थ वाढवणे , स्वताची ओळख निर्माण , जीवनांत उत्तम उपक्रम अंगीकारने , महत्वाकांक्षा ठेवणे व त्या पुर्ण करणे , मोठ्यांचा आदर करणे , विनम्रभाव , आत्मविश्वास , ध्येय व इच्छाशक्ती बाळगणे , मुलांच्या यशाची गुरुकिल्ली पालकांच्या हातात असते आदी माहिती या कार्यशाळेत संजीव लाटकर देणार आहेत . पालकांनी सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा , असे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांनी जाहीर निमंत्रणाद्वारे कळविले आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा