म्हसळ्यात मोठया राजकिय उलथापालथीची शक्यता...


म्हसळा, प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ . सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या म्हसळा तालुक्यात राजकीयदृष्ट्या होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नाम हासवारे यांना पदमुक्त करा , अशी मागणी त्यांच्याच पक्षातील काही नेतेमंडळी कार्यकर्यांनी केली आहे . कार्यकर्यांच्या तक्रारीची दखल घेत बंड होऊ नये म्हणून ७ फेब्रुवारी रोजी आ . तटकरे यांनी सुतारवाडी येथे पदाधिकार्यांची सभा बोलावली होती . राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदावरून हासवारे यांना डच्चू दिल्यास राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंड होण्याची शक्यता आहे . शिवसेनेचे माजी म्हसळा तालुकाप्रमुख समीर बनकर यांना काही कारणास्तव पक्षातून लांब ठेवण्यात आले होते . पण शहर शिवसेनेमध्ये बदल होऊन शहरातील सर्व सत्ता तरुणांच्या हाती आली . त्यांनी २ फेब्रुवारीला तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांना तर ३ फेब्रुवारीला अनंत गीते यांनी बनकर यांना पक्षात परत घेण्यासाठी निवेदन दिले . तालुक्यात अस्तित्व संपत असतानाच काँग्रेसने तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी डॉ . मुईज शेख यांच्या खांद्यावर दिली . डॉ . शेख यांनी तालुकाध्यक्ष पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त झाली असून मागील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपले अस्तित्व सिद्ध केले होते . आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सेनेसोबत हातमिळवणी करत डॉ . शेख यांनी राष्ट्रवादीची चांगलीच गोची केली आहे ९ फेब्रुवारी रोजी बॅ . ए . आर अंतुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले असून शहराच्या कानाकोपर्यात बॅनरबाजी करण्यात आली होती . फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या तीन घटनांमुळे म्हसळा तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे . राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये चाललेल्या नाराजीनाट्याचा सेनेला नक्कीच फायदा होणार हे निश्चित . . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा