म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोत अभियांनांतंर्गत तालुक्यातील महिला बचत गटांना कर्ज वितरण व मंजुरी सत्कार कार्यक्रमात चतगटांना दहा लाख तीस हजार रूपयांचे केले कर्ज वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना म्हसळा तालुका पंचायत समिती उपसभापती मधुकर गायकर यांनी सांगितले की , महिला बचत गट सक्षम झाले तरच आपल्या देशाला जलदगतीने प्रगती करता येईल . सर्वच क्षेत्रात सध्या महिलावर्ग अग्रेसर आहेत . ग्रामीण भागात महिला आता बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायिक बनल्या आहेत . केवळ शेती हा उद्देश समोर न ठेवता बचत गटामार्फत विविध खाद्यपदार्थ तयार करून कोकणासह मुंबईत पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात आहेत . त्यामुळे आता महिला बचत गट दिवसेंदिवस प्रगती करत आहेत . या मेळाव्यासाठी पंचायत समिती सभापती उज्ज्वला सावंत , उपसभापती मधुकर गायकर , सदस्या छाया म्हात्रे संदीप चाचले , गटविकास अधिकारी प्रभे , बैंक ऑफ इंडिया शाखा - म्हसळा व्यवस्थापक भडवळकर , बैंक ऑफ इंडिया शाखा मेंदडी व्यवस्थापक आशिष रुपवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जवाटप करण्यात आले याप्रसंगी तालक्यातील महिला बचत गटांनी अन्य शहरात मुंबई , पालघर ठिकाणी कोकण सरस मोहत्सवात सहभाग घेणारे करजाई बचत गट निगडी यांना सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आला तर सुरई येथील आधार महिला बचत गट यांनी महालक्ष्मी सरस अंतर्गत रायगड जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला . त्यांना राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कार प्राप्त केला . त्याचे वितरण या कार्यक्रमामध्ये करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी परकाले यांनी केले व सूत्रसंचालन साळवे व लेमले गट समन्वयक यांनी केले . या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक महिला उपस्थित होत्या .
Post a Comment