प्रासोल व्यवस्थापन नरमले. मनसे तालुकाध्यक्ष महेश सोगे यांचे ऊपोषण मागे. शेतक-याना नुकसानभरपाई.
खालापूर - मनोज कळमकर
कारखान्यातून सोड़ण्यात येणा-या सांड़पाण्यामुळे नापिक झालेल्या शेतीला नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषणाला बसलेल्या मनसे तालुकाध्यक्ष महेश सोगे यांचे उपोषण अखेर पाचव्या दिवशी समाप्त झाले असून कारखाना व्यवस्थापनाने नुकसनग्रस्त शेतक-याला तेरा हजार प्रत्येकी भरपाई दिली आहे.खालापूर तालुक्यातील होनाड़ हद्दीतील प्रासोल कारखान्यातून सोड़ण्यात येणा-या सांड़पाण्यामुळे त्या भागातील भाजीपाला पिकवणा-या शेतक-यांचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतक-यावर ऊपसमारीची वेळ आली होती.
प्रासोल कारखाना व्यवस्थापनाने शेतक-याना दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी महेश सोगे मंगळवार पासून खालापूर तहसिल कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसले होते.प्रासोल व्यवस्थापन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंञण मंड़ळाकड़ून काहिच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त होते.परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून तहसिलदार राजेंद्र चव्हाण,पोलीस निरिक्षक शेख लक्ष ठेवून होते.तहसिलदारानी गुरूवारी कारखाना व्यवस्थापन आणि मनसे कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी चर्चा देखील घड़वून आणली.परंतु कारखाना व्यवस्थापन दहा हजार प्रत्येक शेतकरी या मुद्द्यावर अड़ून बसल्यामुळे चर्चा फिस्कटली होती.अखेर शनिवारी पुन्हा तहसिलदाराच्या मध्यस्तीने कारखाना व्यवस्थापनाने प्रत्येक शेतकरी तेरा हजाराची मदत देण्याचे कबूल केल्यानंतर तहसिलदार राजेंद्र चव्हाण,पोलीस निरिक्षक शेख,प्रासोल कारखान्याचे प्रभू,अतुल साळवी,महेश सावंत यांच्या ऊपस्थितीत महेश सोगे यानी उपोषण मागे घेतले.यावेळी प्रासोलच्या अधिका-यानी नुकसान भरपाईचा धनादेश शेतक-याच्या हवाली केला.
Post a Comment